मुंबई : चिनी अॅप्सपासून धोका आहे हे आपल्याला आधी माहिती होतं तर या कंपन्या का सुरु होत्या? बंदीसाठी 20 जवानांच्या बलिदानाची वाट पाहात होता का?, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
चीनचं आर्थिक कंबरडं मोडावं ही सगळ्यांची भूमिका आहे. चीनच्या गुंतवणूकीबाबतही आर्थिक धोरण ठरवलं पाहिजे. अन्यथा पाकिस्तानसोबत जसे संबध जोपासले जातात तसंच होवू नये, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
चिनी अॅप्सवरील बंदीचं मी तुर्तास स्वागत करतो. पण तुमची गोडीगुलाबी झाल्यावर हा धोका नाही गुलाबजाम होता असं होवू नये, असा टोला संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला. भारत-चीन सीमावाद हा विषय राजकीय धोरणात्मक आहे. याचे राजकारण होवू नये. सीमेवर आपले जवान समर्थ आहेत, असंही संजय राऊत म्हणाले .
Read More भारतातीय कोविड-19 लस ‘कोवॅक्सिन’ला क्लिनिकल ट्रायलची परवानगी