22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रबदलीसाठी वाशिले, दबाव आणणा-या अधिका-यांवर शिस्तभंगाची कारवाई !

बदलीसाठी वाशिले, दबाव आणणा-या अधिका-यांवर शिस्तभंगाची कारवाई !

एकमत ऑनलाईन

मुंबई : मलई असलेल्या क्रीम पोस्टिंग मिळवण्यासाठी फिल्डिंग लावणा-या अधिका-यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री रंिवद्र चव्हाण यांनी दणका दिला आहे. बदल्या होऊनही अनेक अधिकारी आपल्या पदावर रुजू झालेले नाहीत. त्यांच्या सोयीनुसार पदस्थापना मिळावी यासाठी विविध माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही निर्दशनास आले आहे. अशा अधिकारी- कर्मचा-यांवर कारणे दाखवा नोटीस बजावून शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र्र चव्हाण यांनी दिले आहेत.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांची आढावा बैठक घेतली. याबैठकीला विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मंत्री रविंद्र्र चव्हाण यांनी अधिका-यांच्या कामाचा व त्यांच्या कार्यपध्दतीचा आढावा घेतला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या आस्थापनेचाही आढावा घेतला. अनेक अधिकारी व कर्मचारी त्यांच्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे मुदतीमध्ये पूर्ण होत नाहीत व त्यांच्या कामाचा ताण हा अन्य अधिका-यांवर पडत असल्याची बाब चव्हाण यांच्या निदर्शनास आली. याची गंभीर दखल घेत चव्हाण यांनी पदस्थापनेच्या ठिकाणी तातडीने रुजु न होणा-या अधिकारी कर्मचा-यांवर कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्या विरुध्द शिस्तभंगाची कारवाई सुरु करण्याचे आदेश दिले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या