Thursday, September 28, 2023

नक्षल्यांच्या हालचालींवर नजर

नागपूर : दोन हजारच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर नक्षलवाद्यांजवळ असलेल्या दोन हजारांच्या नोटा बदली करण्यासाठी नक्षलवाद्यांची धडपड सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर त्यांच्या हालचाली वाढल्या असून रांजणगाव येथे दोन नक्षल समर्थकांना नोटा बदलीला जात असताना अटक करण्यात आल्याचे महाराष्ट्र नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख संदीप पाटील यांनी सांगितले. नोटबंदीनंतर नक्षल स्थानिक व्यापारी, व्यावसायिक व तेंदूपत्ता कंत्रादार यांच्यावर दबाव आणून नोटा बदली करण्याची शक्यता आहे.

माओवादी चळवळ चालवताना माओवाद्यांना मोठ्या प्रमाणात पैशाची गरज असते. माओवाद्यांकडे हे पैसे एक तर खंडणीच्या माध्यमातून येतात किंवा त्यांच्या समर्थकांनी पाठवलेला असतो. जंगलात हा पैसा हाताळताना माओवादी दोन हजारच्या नोटेला अधिक प्राधान्य देत होते.

कारण एक तर दोन हजारच्या नोटा जंगलात हाताळताना सोपे जायचे किंवा जमिनीखाली लपून ठेवताना त्या नोटांचा आकार लहान असायचा. महत्वाचे म्हणजे शस्त्र किंवा उपकरणे खरेदीसाठी पैसा एका ठिकाणावरून दुस-या ठिकाणी पाठवताना दोन हजारच्या नोटा माओवाद्यांसाठी सर्वोत्तम चलन होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजारांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता माओवाद्यांची कोंडी झाली आहे.

प्रत्येक पोलिस ठाण्याला अलर्ट
नोटबंदीच्या निर्णयानंतर माओवादी दोन हजारच्या नोटांची बदली करण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. रांजणगाव येथे दोन नक्षल समर्थकांना ६ लाखांच्या किमतीच्या नोटांची बदली करताना अटक करण्यात आली. त्या तपासात माओवादी दोन हजाराच्या नोट बदलीसाठी कंत्राटदार व व्यापा-यांवर दबाव टाकत आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याला अलर्ट देण्यात आला आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या