24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeमहाराष्ट्रपहा व्हिडिओ : बापरे.....वाहून जाणा-या तरुणाला गावक-यांनी वाचवल!

पहा व्हिडिओ : बापरे…..वाहून जाणा-या तरुणाला गावक-यांनी वाचवल!

एकमत ऑनलाईन

नेवासा (अहमदनगर) : नेवासा तालुक्यातील शिरेगाव-खरवंडी रस्त्यावरील पुलावरील पाण्यात वाहून जात असलेल्या तरुणाला शिरेगाव ग्रामस्थांनी आपला जीव धोक्यात घालून वाचवले. ही घटना आज (रविवारी) दुपारी घडली.
पुलावरून पाणी वाहत असतानाही तरुणाने पत्नीला मोटारसायकलवरुन खाली उतरविले. स्वत: मोटारसायकल पाण्यात घातली. पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत गेला.

नदीत असलेल्या झाडाला अडकल्याने झाडाला पकडून तो जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता. पत्नीने आरडाओरड केल्याने शेजारील वस्तीवरील काही युवक पळत आले. त्यांनी तात्काळ दोरखंड आणले. दोरखंडाने तरुणास ओढून प्रवाहाबाहेर काढले. अर्धा तास हा चित्तथरारक प्रकार सुरु होता.

लोहा तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्र व 29 आरोग्य उपकेंद्राचा कारभार रामभरोसे !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या