24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रकोल्हापुरात पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ ;आतापर्यंत ४४ बंधारे पाण्याखाली

कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ ;आतापर्यंत ४४ बंधारे पाण्याखाली

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. सोमवारी दिवसभर संततधार सुरू होती. त्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत दुपारनंतर वाढ सुरू झाली आहे. ४४ बंधारे पाण्याखाली गेले असून, पावसाने शहरासह जिल्ह्यातही जनजीवनावर परिणाम झाला. जिल्ह्यात १५ जुलैपर्यंत अतिवृष्टी होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

कोल्हापुरात पावसाचा कहर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मागील वर्षीची परिस्थिती पुन्हा ओढावते की काय असा प्रश्न कोल्हापूरच्या जनतेला पडला आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून रत्नागिरीच्या जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली
मुसळधार पावसामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे आता नागरिकांची स्थलांतराची तयारी सुरू केली आहे. पंचगंगेच्या वाढत्या पाणीपातळीमुळे ४४ बंधारे पाण्याखाली गेले असून, पावसाने शहरासह जिल्ह्यातही जनजीवनावर विस्कळीत केले आहे. जिल्ह्यात १५ जुलैपर्यंत अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यातील १० धरणांतून विसर्ग सुरू
जिल्ह्यातील १५ धरणांपैकी १० प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तुळशी, चिकोत्रा, चित्री, जंगमहट्टी व आंबेओहोळ ही पाच धरणे वगळता उर्वरित दहा धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तीन धरणे पूर्ण भरल्याने त्यांच्या सांडव्यांवरून पाणी वाहत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या