मुंबई : गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर अशी वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी मुंबई बंदर प्राधिकरणाने नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडला वाहतुकीची परवानगी दिली.
या सेवेमुळे गेट वे ऑफ इंडियाहून बेलापूरला ६० मिनिटांमध्ये पोहोचणे शक्य होणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सोमवार ते शुक्रवार सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशी फेरी सुरू होणार आहे.