30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeमहाराष्ट्रटीआरपी घोटाळ्यात वाझेंनी घेतली ३० लाखांची लाच

टीआरपी घोटाळ्यात वाझेंनी घेतली ३० लाखांची लाच

एकमत ऑनलाईन

मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अटकेत असलेले निलंबित पोलिस निरीक्षक सचिन वाझे याच्या अडचणीत आणखी वाढ होत असताना पाहायला मिळत आहे. तपास यंत्रणा तपास करत असताना अनेक गोष्टींचे पुरावे त्यांच्या हाती लागत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. याच दरम्यान आता आणखी एका घोटाळ्यात सचिन वाझेचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे.

बीएआरसी म्हणजेच बार्ककडून टीआरपी प्रकरणात सचिन वाझे याने गुन्हे शाखेच्या एका पोलिस निरीक्षकाच्या मदतीने ३० लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणातील वृत्त नुकतेच एका वृत्तसंस्थेने प्रकाशित केले आहे. टीआरपी घोटाळ्याचा तपास करत असताना कंपनीच्या अधिका-यांना त्रास न देण्याच्या अटीखाली सचिन वाझेने ३० लाख रुपये लाच घेतल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

या सर्व प्रकरणात सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडी सखोल चौकशी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता सचिन वाझेच्या अडचणीत आणखी भर पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व प्रकरणात भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करून सचिन वाझेची टोळी टीआरपी घोटाळ्यात सामील असल्याचा दावा मागच्या महिन्यात १५ मार्च २०२१ ला केला होता. त्यानंतर आता वाझे याच्यावर ईडी नेमकी काय कारवाई करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इंग्लंडमध्ये नेझल स्प्रेची चाचणी यशस्वी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या