32 C
Latur
Monday, March 27, 2023
Homeमहाराष्ट्रआम्ही रक्त देणारे ढेकूण

आम्ही रक्त देणारे ढेकूण

एकमत ऑनलाईन

जळगाव : बाळासाहेबांचे नाव वापरू नको हे पाचव्या सहाव्या वेळेस झाले असून त्यामुळे त्या गोष्टीला किती धार द्यावी, हे मला तरी वाटते चुकीचे होईल. उद्धव ठाकरेंसोबत मी ३५ वर्षे राहिलो आहे, त्यांचे शब्द प्रयोग माहिती आहेत, त्यामुळे आम्ही रक्त पिणारे नाही तर रक्त देणारे ढेकूण आहोत, असल्याचे सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिलीच सभा कोकणातील खेड येथे झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. याच पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.

यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की, बाळासाहेब ही त्यांची स्वत:ची प्रॉपर्टी नाही, मान्य आहे ते त्यांचे वडील आहेत, पण ते या देशाची आणिहिंदू समाजाची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे त्यांचे नाव कुणीही वापरेल. महापुरुषांचे फोटो, नाव वापरणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. असे सांगत उद्धव ठाकरेंनी खेडच्या सभेत शिंदे गटावर केलेल्या टीकेला गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले की, बाळासाहेबांच्या नाव वापरू नका, हे पाचव्या सहाव्या वेळेस झालंय, त्यामुळे त्या गोष्टीला किती धार द्यावी हे मला तरी वाटतं चुकीचं होईल. महापुरुषांचे फोटो, नाव वापरणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे.

बाळासाहेब ही त्यांची स्वत:ची प्रॉपर्टी नाही, मान्य आहे ते त्यांचे वडील आहेत, पण ते या देशाची आणि हिंदू समाजाची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे त्यांचं नाव कुणीही वापरेल. उद्धव ठाकरेंसोबत मी ३५ वर्षे राहिलो आहे, त्यांचे शब्द प्रयोग मला माहिती असून आम्ही रक्त पिणारे नाही तर रक्त देणारे ढेकूण आहोत, असे गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तरात म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या