24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeमहाराष्ट्रकेंद्र व राज्य सरकारच्या भांडणात आमचा बळी जातोय

केंद्र व राज्य सरकारच्या भांडणात आमचा बळी जातोय

एकमत ऑनलाईन

ठाणे : ईडीकडून होत असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मोठे विधान केले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या भांडणात आमचा बळी जात आहे, असा घरचा आहेरच प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारला दिला आहे. प्रताप सरनाईक यांनी मीडियाशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणामुळे आमचा बळी जात आहे हे मी पूर्वीपासून सातत्याने मीडियासमोर बोलत आलो आहे. मग प्रताप सरनाईक असो की अन्य कोणी? आरोप-प्रत्यारोप होत असतात. विरोधक त्यांचे काम करत असतात, असे सांगतानाच मी किरीट सोमय्या यांच्यावर १०० कोटींचा दावा दाखल केला आहे. ते चुकीचा मेसेज पसरवत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर दावा केला आहे. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल, असे सरनाईक म्हणाले.

कुटुंबीयांना त्रास होतोय
आम्ही राजकारण करत असताना राजकीय पक्षांना अंगावरही घेतो. मात्र त्यात कुणाच्या कुटुंबीयांना आणत नाही. आता आमच्या कुटुंबीयांवरही घाव घातला जात आहे. त्यांनाही प्रकरणांमध्ये गोवले जात आहे. त्याचा कुटुंबीयांना त्रास होत असतो, असे त्यांनी सांगितले.

कोरोना नाहीसा होवो

गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही गणेशोत्सव साजरा करत आहोत. इको फ्रेंडली मूर्तीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव आम्ही सहकुटुंब साजरा करतो. जगातून, राज्यातून आणि शहरांतून लवकरात लवकर कोरोना नाहीसा होवो अशी मागणी गणरायाकडे केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या