रत्नागिरी : शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गटाचे उदय सामंत म्हणाले, आम्ही शिवसेनाच आहोत. आम्ही शिंदे नावाचा दुसरा गट स्थापन केला नाही.
गट स्थापन करून दुसरीकडे कुठे आम्ही जाणार नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन पुढे जातोय. मातोश्री, शिवसेना भवन हायजॅक करावे, अशी कुठलीही आमची भूमिका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उदय सामंत म्हणाले, आम्ही न्यायालयीन लढा लढत आहोत. शिंदे यांच्यासोबत कायदेशीर लढाईत आम्ही आहोत. आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणे आपल्या राजकारणात बसत नाही. दर पाच वर्षांनी आम्ही निवडणुका लढत आलोत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील आमदार हा भगवा घेतलेला आणि खासदारसुद्धा शिवसेनेचाच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.