मुंबई : आम्ही बंड केलेला नाही उठाव केला आहे. आज माझ्या सारख्या माणसाला म्हणतात गुलाबराव तुम्हाला टपरीवर पाठवीन. रिक्षा चालवणारा, चहा विकणारा ज्यांना काही काम नव्हते त्यांना नेता केले. आता जे शिवसेना सोडून जातात ते पुन्हा निवडून येत नाही असे दादा म्हणाले.
पण दादा आम्ही शिवसेना सोडली नाही त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आमचा साधा मेंबर जरी फुटतो तेव्हा आम्ही विचार करतो. चाळीस आमदार फुटले ही आजची आग नाही, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी आपली बंडाबद्दलची भावना बोलून दाखवली आहे.