28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रआमच्याकडे निष्ठेचे खोके

आमच्याकडे निष्ठेचे खोके

एकमत ऑनलाईन

मुंबई : आमच्याकडे आलेले खोके हे निष्ठेचे आहेत. पैसा आज आहे उद्या कुठुन आणणार, पण निष्ठेचा झरा आटत नाही, असा टोला शिंदे सरकारला लगावत, लवकरच मी महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे सुतोवाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबईत शिवसैनिकांना एका मेळाव्यात संबोधताना ठाकरे बोलत होते.
राज्यात सत्तांतर झाले, त्यावेळी उद्धव ठाकरे गटातील एक-एक आमदार शिंदेंच्या गोटात सामिल झाला. त्यावेळी एका आमदाराला पन्नास कोटी रुपये दिल्याचा आरोपही केला जात होता. त्यानंतर विधिमंडळाच्या अधिवेशनावेळी महाविकास आघाडीतील आमदारांनी विधानभवनाच्या पाय-याजवळ आंदोलन केले. तेथे त्यांनी पन्नास खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी शिंदे सरकारमधील मंत्री, आमदारांविरुद्ध केली होती. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी हाच धागा पकडून शिंदे सरकारला टोला लगावला.

आपल्याकडे निष्ठेचे खोके
ठाकरे म्हणाले, माझाही दौरा मी महाराष्ट्रात करणार आहे. आज सुषमा अंधारे आणि उपनेत्यांचा दौरे आहेत. एक मेळावा होईल त्यानंतर दस-याला आपण मेळाव्यात भेटणारच आहोत. हे सर्व सुरु असताना काल सांगलीचे लोक आले होते. हे आपण पेपरमध्ये वाचलेच असेल. आज खोके गाजत आहेत, ते खोके घेऊन आले ते तसे खोके नव्हते तर ते निष्ठेचे खोके होते.

पैसा संपेल, निष्ठा नाही
उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारला जोरदार टोला लगावला. ते म्हणाले, आपली लढाई पैशांविरुद्ध निष्ठा अशी आहे. पैसा संपेल पण निष्ठा संपणार नाही. पैसा कुठून आणणार पण, निष्ठेचा झरा कुठेही आटू शकत नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या