25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रआम्हालाही त्यांच्यावर हल्ले करावे लागतील

आम्हालाही त्यांच्यावर हल्ले करावे लागतील

एकमत ऑनलाईन

मुंबई : मंगळवारी रात्री उशिरा माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. या प्रकरणी शिंदे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अब्दुल सत्तार यांनीही या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या आमदारांवर असे हल्ले होत असतील, तर आम्हालाही त्यांच्यावर हल्ले करावे लागतील’, असे ते म्हणाले.

या हल्ल्याचा जितका निषेध करावा, तितका कमी आहे. ही तत्त्वाची लढाई आहे, ती निश्चित लढावी. पण असा हल्ला करणे चुकीचे आहे. असे हल्ले आमच्या आमदारांवर होत असतील तर आम्हालाही त्यांच्यावर असे हल्ले करावे लागतील. एकाकडून मारले जात असेल तर दुस-याकडून बघायची भूमिका घेतली जाऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

या हल्ला करणा-या दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच या हल्ल्यामागे कोण आहे, याचासुद्धा शोध घ्यायला हवा, असेही ते म्हणाले. शिवसेना नेते बबन थोरात यांनी दिसेल तिथे आमदारांच्या गाड्या फोडा, त्यांचा सत्कार उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येईल, असे वक्तव्य केले होते.

याबाबतही अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली. बबन थोरात यांचे वक्तव्य मी ऐकले आहे. त्यांच्यावरही योग्य ती कारवाई होईल. कोणी असे वक्तव्य करत असेल आणि उद्धव ठाकरे त्यांचा सत्कार करत असतील, तर उद्धव ठाकरेंचा या सर्व प्रकाराला पाठिंबा आहे, असा त्याचा अर्थ निघतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंवरही कारवाई करावी लागेल, असेही अब्दुल सत्तार म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या