24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeमहाराष्ट्रमागणी व पुरवठ्यावरआधारित अर्थव्यवस्था हवी

मागणी व पुरवठ्यावरआधारित अर्थव्यवस्था हवी

एकमत ऑनलाईन

पुणे : ‘कोविड-१९ मुळे जगभरातील अर्थव्यवस्थेमध्ये चढ-उतार निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीत चांगले ध्येयधोरण आखून अर्थव्यवस्था स्थिर करणे गरजेचे आहे. अशावेळेस मागणीवर आधारित मोठ्या प्रमाणात पुरवठा झाल्यास देशाची अर्थव्यवस्था मजबूत बनेल.’ असे मत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी मांडले.
भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन ११ व्या भारतीय छात्र संसदेच्या पाचव्या सत्रात ‘द इंडियन इकॉनॉमी बियाँड द ब्लेम गेम’ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. यावेळी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे एमडी व सीईओ अश्विन कुमार चौहान, ओडिशाच्या कटक येथील आमदार सौविक बिस्वाल हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड हे उपस्थित होते.

यशवंत सिन्हा म्हणाले,‘‘कृषी क्षेत्र हे भारतीय आर्थिक स्थितीला स्थिर करू शकेल. त्यामुळे यावर सर्वाधिक भर देणे गरजेचे आहे. तसेच लोकांच्या गरजेनुसार मागणी वाढवावी. त्यात घर, हाऊसिंग प्रकल्प, हायवे आणि रस्ते यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे गरजेचे आहे. सर्वसामान्य व्यक्ती हा पेट्रोलच्या वाढत्या महागाईमुळे त्रस्त झाला आहे. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.’’

या वेळी अश्विनकुमार चौहान , सौविक बिस्वाल विद्यार्थी प्रतिनिधी ईशा पेंडसे, रितिका सिंग, कौशल पांडे आणि आनंद सिंग यांनी विचार मांडले. प्रा. डॉ. सुब्बाराव यांनी स्वागतपर भाषण केले. डॉ. पौर्णिमा बागची यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. जयराज यांनी आभार मानले.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या