27 C
Latur
Saturday, September 19, 2020
Home महाराष्ट्र मराठा आरक्षणासाठी पक्षभेद बाजूला ठेऊन एकजुटीने लढणार ! -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मराठा आरक्षणासाठी पक्षभेद बाजूला ठेऊन एकजुटीने लढणार ! -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.१६ (प्रतिनिधी)  मराठा आरक्षण कायदा हा विधीमंडळात सर्व पक्षांनी एकमुखाने केलेला आहे. त्यामुळे सरकार कायद्याचा सर्वोच्च न्यायालयातील कायेदशीर लढा जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी पक्ष भेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला विरोधी पक्षांसह विविध पक्षांनी आज सकारात्मक प्रतिसाद दिला. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी जो काही निर्णय घेईल त्याला पूर्ण पाठिंबा असेल विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितले. तर येत्‍या एक ते दोन दिवसांत राज्य सरकार पुढील रणनीतीबाबत अंतिम निर्णय घेईल.ज्‍येष्‍ठ विधिज्ञ तसेच इतर व्यक्‍तींशी चर्चा करून सर्वोच्च न्यायालयात पुढील न्यायालयीन लढाई कशी लढायची याचाही निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्‍पष्‍ट केले.सरकार पूर्णपणे मराठा समाजाच्या सोबतच उभे असल्‍याने राज्‍यात कोणी आंदोलन करू नये असे आवाहनही त्यांनी मराठा समाजाला केले.

मराठा आरक्षण कायद्याच्या सर्वोच्च न्यायालयातील लढ्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्ष तसेच विविध पक्ष नेते यांची बैठक सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, जलसंपदा राज्यमंत्री प्रहार संघटनेचे बच्चू कडू, शेकापचे आमदार जयंत पाटील, शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे, लोकभारती पक्षाचे आमदार कपिल पाटील उपस्थित होते. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार तसेच बहूजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले.

मराठा आरक्षणाचा कायदा आपण विधीमंडळात एकमुखाने मंजूर केला आहे. या कायद्यातील तरतुदींना सर्वोच्च न्यायालयाने अनपेक्षीतपणे अंतरिम स्थगिती दिली. पण हा राज्यातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन हा कायदा केला आहे. त्यामुळे हा कायदा कायम राहावा यासाठी सर्व मिळून प्रयत्न करणे अपेक्षीत आहे. काही तरतुदींना स्थगिती दिल्यामुळे जो संभ्रम निर्माण झाला आहे, तो दूर करण्याची गरज आहे. मराठा समाजातील तरुणांसाठी इतर सुविधा आणि सवलती देण्याबाबतही प्रयत्न सुरु आहेत. सर्वोच्च न्यायालयात ठामपणे बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पुढे जाणार आहोत. याशिवाय विविध घटकांशीही विचार विनीमय सुरु आहे. यात आजच्या बैठकीच्या रुपाने विविध पक्षांनीही सहकार्य देऊ केले आहे, हा कायदेशीर आपण यापुर्वीही एकजुटीने लढत होतो आणि आताही एकजुटीने प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. विधान सभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विरोधी परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी चर्चेत हा लढा कायदेशीर आहे. हा विषय न्यायालयीन असल्याने या कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी सरकार जो प्रयत्न करेल त्यासोबत विरोधी पक्ष असेल, असे सांगितले.

बैठकीत उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी प्रास्ताविक केले. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष श्री. चव्हाण यांनीही या कायद्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्याबाबतच्या मुद्द्यांबाबत माहिती दिली. यावेळी विधान सभेतील विरोधी पक्ष नेते श्री. फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नते श्री. दरेकर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह, आमदार कपिल पाटील, आमदार श्री. मेटे, शेकापचे आमदार श्री. पाटील यांनी मांडलेल्या विविध मुद्द्यांवरही चर्चा झाली. महाधिवक्ता अँड. आशुतोष कुंभकोणी, अँड. विजयसिंह थोरात यांनी सर्वोच्च न्यायालयातील विविध मुद्द्यांबाबत माहिती दिली. बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव राजेश लढ्ढा, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव किशोर राजे-निंबाळकर उपस्थित होते.

सहयाद्री अतिथिगृह येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुददयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.मुख्यमंत्री उदधव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रीमंडळातीन अनेक मंत्री,विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर,शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे तसेच मराठा समाजातील विविध संघटनांचे नेते या बैठकीला उपस्‍थित होते.

विविध योजनांवर विचार !
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायदेशीर लढाईबरोबरच मराठा समाजाला या परिस्‍थितीत विविध योजनांच्या माध्यमातून कसा दिलासा देता येईल यावरही बैठकीत विस्‍तृत चर्चा करण्यात आल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने हा मुददया घटनापीठाकडे सोपविताना आरक्षणाला जी स्‍थगिती दिली त्‍यामुळे संभ्रम निर्माण झाल्‍याचे सांगून मुख्यमंत्री उदधव ठाकरे म्‍हणाले,या प्रश्नावर ज्‍येष्‍ठ विधिज्ञ तसेच मराठा समाजाच्या संघटनांसोबत चर्चा करण्यात आल्‍या आहेत.आज विरोधी पक्षनेत्‍यांसोबत देखील चर्चा केली.त्‍यांनी देखील आपण या प्रश्नी राज्यसरकारसोबत असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे.मराठा आरक्षणाचा कायदा सर्व राजकीय पक्षांनी एकमताने संमत केल्‍याने यात कोणी राजकारण करण्याचा प्रश्नच येत नाही.या एकूणच मुदयावर येत्‍या एक-दोन दिवसांत राज्‍यसरकार अंतिम निर्णय करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आंदोलन न करण्याचे आवाहन
राज्‍यातील मराठा समाज आता आक्रमक झाला असून अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत.या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या तरूणांनी आंदोलन करू नये असे आवाहनही मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी केले.आम्‍ही पण आंदोलनेच करणारे आहोत.सरकार जेव्हा ऐकत नसते तेव्हा आपण आंदोलने करतो.आता तर सरकार मराठा समाजासोबत ठामपणे उभे आहे त्‍यामुळे आंदोलने करू नयेत असे मुख्यमंत्री उदधव ठाकरे म्‍हणाले.

मराठा आरक्षणप्रश्नी राज्‍य सरकारसोबतच !-देवेंद्र फडणवीस
मराठा आरक्षणाच्या मुददयावर आम्‍ही सरकारसोबतच आहोत.या विषयावर कोणालाच राजकारण करायचे नाही.सरकारने या प्रश्नी योग्‍य तो कायदेशीर पर्याय निवडावाच पण ते करताना शैक्षणिक प्रवेश असतील वा सारथी तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल या माध्यमातून तातडीने दिलासा दयावा अशी अपेक्षा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्‍त केली.

सहयाद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी आयोजित केलेल्‍या बैठकीत सहभागी झाल्‍यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.मराठा समाजाला जे आरक्षण आम्‍ही दिले होते व जे उच्च न्यायालयाने वैध ठरविले होते ते पुन्हा बहाल झाले पाहिजे.सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी दिलेला निकाल धक्‍कादायक आहे.पण पुन्हा घटनापीठाकडे जाउन स्थ्‍गिती उठविण्याचा पूर्ण प्रयत्‍न आपण केला पाहिजे.सरकार सोमवार-मंगळवारपर्यंत याचा मसुदा तयार करणार आहे असे सरकारच्या वतीने स्‍पष्‍ट करण्यात आले आहे.केंद्र सरकारचा या प्रकरणी कुठलाही सध्या कुठलाही सहभाग नाही.हा राज्‍याचा कायदा आहे त्‍याचा खटला राज्‍यानेच लढविला पाहिजे.केंद्र यात काही करू शकत नाही.मराठा समाजात यामुळे उद्रेक निर्माण झाला आहे.तो स्वाभाविकच आहे.पण हिंसक आंदोलने होउ नयेत.महाराष्‍ट्र शांतच राहिला पाहिजे अशी अपेक्षाही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्‍त केली.

मराठा तरूण-तरूणींच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.राज्‍य सरकारने ते दूर केले पाहिजे.राज्‍य सरकारने सारथी संस्‍था संपविली तिचे पुनरूज्‍जीवन केले पाहिजे.शैक्षणिक प्रवेशांसाठी जागा वाढविल्‍या पाहिजेत.मराठा विदयाथर्यांची फी दिली पाहिजे.तसेच उदयोगधंदयांसाठी मदत व्हावी म्‍हणून अण्णासाहेब पाटील महामंडळाला पुन्हा निधी उपलब्‍ध करून दिला पाहिजे असेही देवेंद्र फडणवीस म्‍हणाले.

ताज्या बातम्या

450 भारतीय कामगारांना रोजगाराअभावी रस्त्यावर मागावी लागतेय भीक

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांच्या नोकर्‍या गमावल्या आहेत. सौदी अरेबियातील 450 भारतीय कामगारांना रोजगाराअभावी रस्त्यावर भीक मागण्यास भाग पडले आहे. त्यानंतर प्रशासनाने...

धक्‍कादायक! कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं

जयपुर : एकीकडे देशात कोरोना संसर्गाचा धोका जलद गतीने वाढत आहे. यादरम्यान भारतीय हवाई सेवाकडून निष्काळजीपणा केल्याची बाब समोर आली आहे. येथे एअर इंडियाची...

करोनाने घेतला बळी ; मृत्यूनंतर मोबाइल रुग्णालयातून गेला चोरीला

पिंपरी - करोनाने ग्रासलेला रुग्ण जीवन आणि मृत्यूमध्ये झुंजत होता. परंतु दुर्दैवाने करोनाने त्यांचा बळी घेतला. धक्‍कादायक बाब म्हणजे करोनाने मृत्यू झाल्यानंतर या रुग्णाचा...

25 दिवसानंतर ऑपरेशन करून महिलेच्या पोटातून काढण्यात आला कपडा

भोपाळ :  सिझेरियन डिलिव्हरी केल्यानंतर एक महिला जेव्हा आपल्या घरी गेली तेव्हा तिला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा समजले की,...

ड्रग्स प्रकरण: ABCD फेम किशोर शेट्टीला अटक

मुंबई : सिटी क्राईम ब्राँच पोलीस (CCB)ने शनिवारी ड्रग्स प्रकरणात किशोर अमन उर्फ किशोर शेट्टीला अटक केली आहे. किशोर शेट्टी एक प्रसिद्ध डान्सर आहे...

घरात चोरी करण्यासाठी गेला चोर; एसीच्या गारव्यामुळे त्याला लागली गाढ झोप

गोदावरी : बरेचजण काम करून थकल्यावर एका छोटी झोप घेत असतात. जर ऑफिसमध्ये एअर कंडीशन असेल तर झोपेला आवर घालणं अधिक अवघड होतं. पण...

बलात्काऱ्यांवर शस्त्रक्रिया करून नपुंसक करण्यात येणार

अबुजा - बलात्काराच्या घटनेत वाढ होत असून अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. याच दरम्यान एका देशाने मोठा निर्णय घेतला आहे. बलात्कार करणाऱ्याला...

वय केले शिथिल : साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश

मुंबई - राज्य सरकारने शाळा प्रवेशाचे वय शिथिल केले असून आता अडीच वर्षांच्या बालकास प्ले ग्रूप/नर्सरीत तर साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यात...

गुगलनं त्यांच्या फायदासाठी केले हे काम-विजय शेखर शर्मा

मुंबई : शुक्रवारी गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून लोकप्रिय पेमेंट अँप पेटीएम हटवल्यानं मोठी खळबळ उडाली होती. काही तासांनंतर ते ऍप पूर्ववत झाले. परंतु पेटीएमचे...

वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे निधन, हदगावकरांचा आधारवड हरपला

हदगाव (प्रतिनिधी) : श्रीकृष्ण मंदिर हदगाव मठाचे मठाधिपती हदगाव तालुक्याचे भूषण परमपूज्य वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे हैदराबाद येथे उपचार सुरू असताना रात्री आठच्या दरम्यान...

आणखीन बातम्या

450 भारतीय कामगारांना रोजगाराअभावी रस्त्यावर मागावी लागतेय भीक

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांच्या नोकर्‍या गमावल्या आहेत. सौदी अरेबियातील 450 भारतीय कामगारांना रोजगाराअभावी रस्त्यावर भीक मागण्यास भाग पडले आहे. त्यानंतर प्रशासनाने...

धक्‍कादायक! कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं

जयपुर : एकीकडे देशात कोरोना संसर्गाचा धोका जलद गतीने वाढत आहे. यादरम्यान भारतीय हवाई सेवाकडून निष्काळजीपणा केल्याची बाब समोर आली आहे. येथे एअर इंडियाची...

करोनाने घेतला बळी ; मृत्यूनंतर मोबाइल रुग्णालयातून गेला चोरीला

पिंपरी - करोनाने ग्रासलेला रुग्ण जीवन आणि मृत्यूमध्ये झुंजत होता. परंतु दुर्दैवाने करोनाने त्यांचा बळी घेतला. धक्‍कादायक बाब म्हणजे करोनाने मृत्यू झाल्यानंतर या रुग्णाचा...

25 दिवसानंतर ऑपरेशन करून महिलेच्या पोटातून काढण्यात आला कपडा

भोपाळ :  सिझेरियन डिलिव्हरी केल्यानंतर एक महिला जेव्हा आपल्या घरी गेली तेव्हा तिला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा समजले की,...

ड्रग्स प्रकरण: ABCD फेम किशोर शेट्टीला अटक

मुंबई : सिटी क्राईम ब्राँच पोलीस (CCB)ने शनिवारी ड्रग्स प्रकरणात किशोर अमन उर्फ किशोर शेट्टीला अटक केली आहे. किशोर शेट्टी एक प्रसिद्ध डान्सर आहे...

घरात चोरी करण्यासाठी गेला चोर; एसीच्या गारव्यामुळे त्याला लागली गाढ झोप

गोदावरी : बरेचजण काम करून थकल्यावर एका छोटी झोप घेत असतात. जर ऑफिसमध्ये एअर कंडीशन असेल तर झोपेला आवर घालणं अधिक अवघड होतं. पण...

बलात्काऱ्यांवर शस्त्रक्रिया करून नपुंसक करण्यात येणार

अबुजा - बलात्काराच्या घटनेत वाढ होत असून अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. याच दरम्यान एका देशाने मोठा निर्णय घेतला आहे. बलात्कार करणाऱ्याला...

वय केले शिथिल : साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश

मुंबई - राज्य सरकारने शाळा प्रवेशाचे वय शिथिल केले असून आता अडीच वर्षांच्या बालकास प्ले ग्रूप/नर्सरीत तर साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यात...

गुगलनं त्यांच्या फायदासाठी केले हे काम-विजय शेखर शर्मा

मुंबई : शुक्रवारी गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून लोकप्रिय पेमेंट अँप पेटीएम हटवल्यानं मोठी खळबळ उडाली होती. काही तासांनंतर ते ऍप पूर्ववत झाले. परंतु पेटीएमचे...

उत्तरप्रदेश सरकारने केली देशातील सर्वात मोठी फिल्म सिटी बनवण्याची घोषणा

लखनऊ : देशभरात सर्वात मोठा हिंदी फिल्मोद्योग म्हणून मुंबईचं नाव प्रसिद्ध आहे. परंतु आता उत्तरप्रदेश सरकारने देशातील सर्वात मोठी आणि सुंदर फिल्म सिटी बनवण्याची घोषणा...
1,249FansLike
116FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...