26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रपडेल ती किंमत उभी करू, मात्र लोकशाहीचे जतन करू

पडेल ती किंमत उभी करू, मात्र लोकशाहीचे जतन करू

एकमत ऑनलाईन

धुळे : एका वेगळ्या रस्त्याने देश चालविला जात आहे. हे थांबविणे आवश्यक असून यासाठी आता तुमची-माझी सगळ्यांची जबाबदारी आहे, काय पडेल ती किंमत उभी करू, मात्र लोकशाहीचे जतन करू, खान्देशचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता तळमळीने उभा राहील, सगळ्यांशी सुसंवाद करू, अशा शब्दांत शरद पवार यांनी कार्यकर्त्यांत स्फूर्ती भरली. तर दुसरीकडे राज्यपालांच्या दोन वर्षांतील दुहेरी भूमिकेवर टीकास्त्र सोडले.

विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर राज्यपालांकडे प्रस्ताव पाठविला. दोन वर्षे सही केली नाही. सरकार बदलले तेव्हा नवे मुख्यमंत्री आले, दोन दिवसांत नवे अध्यक्ष आले. राज्यपालासारखी व्यक्ती एका वर्षात एक तर दुस-या वर्षात दुसरी भूमिका घेत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेने लोकशाहीवर विश्वास ठेवायचा कसा? एका वेगळ्या रस्त्याने देश चालविला जात आहे.

आता तुमची-माझी सगळ्यांची जबाबदारी आहे, काय पडेल ती किंमत उभी करू मात्र लोकशाहीचे जतन करू, अत्याचार करणा-या प्रवृत्तीविरुद्ध उभे राहू. खान्देशचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता तळमळीने उभा राहील, तालुक्यात जाऊन भेटीगाठी घेऊ, सगळ्यांशी सुसंवाद करू, अशा शब्दांत शरद पवार यांनी कार्यकर्त्यांत स्फूर्ती भरली.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार धुळे येथे राष्ट्रवादी भवनाच्या नूतन वास्तूच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय सद्यपरिस्थितीवर ताशेरे ओढले. लोकांशी संवाद साधावा, कार्यकर्त्यांनी गाठीभेटी घेतल्या पाहिजेत. हे पक्षातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी केले पाहिजे. मागील दोन आठवड्यांत राज्यामध्ये अतिवृष्टी झाली, काही ठिकाणी चांगला पाऊस झाला, गडचिरोली, यवतमाळ, नागपूरमध्ये अतिवृष्टीने नुकसान झाले आहे, अजित पवार हे गेल्या तीन दिवसांपासून नुकसानग्रस्त भागाच्या दौ-यावर आहेत.

हाच दृष्टिकोन पक्षाचा असला पाहिजे, संकट आल्यानंतर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कधीही मागे जात नसतो, इथल्या पक्षाची वास्तू अडचणीत होती, ती आज उत्तम स्थितीत झाली आहे, त्यामुळे मला आनंद झाल्याचे ते म्हणाले.
मात्र हे लोकांना आवडले पाहिजे, लोकांना ही जागा आपली आहे हे वाटलं पाहिजे, युवक, महिलांसाठी जागा आहे,

शहराध्यक्षासाठी आहे, जिल्हाध्यक्षासाठी, प्रत्येक कार्यकर्त्यासाठी ही जागा आहे..लोकांना कळले पाहिजे की राष्ट्रवादी भवन आपले आहे, आपल्या समस्या सोडवणारे लोक इथे आहेत. ज्या दिवशी हे चित्र दिसेल त्या दिवशी लोकांच्या विश्वासाला आपण किती पात्र आहोत हे कळेल, कोणत्याही वेळी मग तुम्हाला अडचण येणार आहे. महानगरपालिकेने इथे जागा दिली त्यांचे आभार, काही अटी घालून जागा दिली या सगळ्याचा वास्तूच्या भविष्यासाठी हातभार लागला आहे.

शरद पवार पुढे म्हणाले, सत्तेचे काही जोश असतात, सत्तेचे काही नियम असतात. मात्र सध्या याउलट होत आहे. भाजपवर टीका करताना म्हणाले की, तुमच्याकडे बहुमत आहे, म्हणजे लोकांना हे दिसायला नको, राष्ट्रपतीचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख केलेल्या अधीररंजन चौधरींनी माफीही मागितली. मात्र त्यानंतर सोनिया गांधींवर हल्लाबोल करण्यात आला. सोनिया गांधी फक्त विचारण्यासाठी गेल्या असता त्यांच्यावर सर्वच भाजप नेत्यांनी हल्ला केला. सदनामध्ये भीषण दृश्य बघायला मिळाले. सबंध देशामध्ये महाराष्ट्रात नाचक्की झाल्याचे पाहायला मिळाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या