24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रओबीसी आरक्षणाबाबत कोर्टाने दिलेल्या निकालाचे स्वागत करतो

ओबीसी आरक्षणाबाबत कोर्टाने दिलेल्या निकालाचे स्वागत करतो

एकमत ऑनलाईन

मुंबई : ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावाणी दरम्यान बांठिया अहवालानुसार राज्यातील पुढील निवडणुका व्हायला हव्यात असे म्हटले आहे.

सोबतच जाहीर झालेल्या निवडणुकीला स्थगिती देता येणार नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले. तर कोर्टाच्या याच निकालानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत असून, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सुद्धा कोर्टाच्या निकालाचे स्वागत केले आहे.

न्यायालयाने दिलेल्या निकालावर बोलताना मुंडे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात जो बांठिया आयोग नेमला होता आणि न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे ट्रिपल टेस्टबाबत जे काही निर्णय घेण्यात आले ते अहवाल न्यायालयाने स्वीकारले आहेत. तसेच सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणासहित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश दिला आहे, त्याचे मी आणि आमचा पक्ष स्वागत करत असल्याचे मुंडे म्हणाले.

तसेच आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत ही राष्ट्रवादी पक्ष म्हणून आम्ही भूमिका घेतली होती. तसेच आरक्षण मिळाले नाही तर ज्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहे, त्या ठिकाणी २७ टक्के ओबीसी उमेदवार दिले जाणार असल्याचा निर्णय आम्ही घेतला होता. मात्र न्यायालयाने सर्वसामान्य ओबीसी माणसाची भूमिका ऐकून जो निर्णय दिला आहे, त्याबद्दल आभार मानतो, असे मुंडे म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या