मुंबई : पंढरपूर येथील कुंभार घाटाच्या सुरक्षिततेबाबत काय उपाययोजना केल्या, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे करत त्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
कोरोनानंतर २ वर्षांनी यंदा आषाढीची वारी निर्बंधांविना पार पडत आहे. कुंभार घाटावर घडलेल्या दुर्घटनेपासून प्रशासनाकडून अद्याप कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. यासंदर्भात हायकोर्टात दाखल याचिकेवर हा सवाल उपस्थित केला.