24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeमहाराष्ट्रजे हनुमानाचे नाही झाले, ते रामाचे काय होणार?

जे हनुमानाचे नाही झाले, ते रामाचे काय होणार?

एकमत ऑनलाईन

मुंबई : जे हनुमानाचे नाही झाले, ते प्रभू श्रीरामाचे काय होणार?, अशी टीका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी शिवसेनेच्या अयोध्या दौ-यावर केली आहे. राणा दाम्पत्यावरील राजद्रोहाच्या खटल्याची आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यासाठी राणा दाम्पत्य मुंंबईत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनेला पुन्हा लक्ष्य केले.

महाराष्ट्रात हनुमान चालिसा म्हणण्यासाठी उद्धव ठाकरे नकार देतात. हनुमान चालिसा म्हणणा-यांवर राजद्रोहाचे खटले दाखल केले जातात. महाराष्ट्रात अशा प्रकारे हिंदुत्वाचा अपमान करून शिवसेना आज अयोध्येत रामाच्या दर्शनाचे ढोंग करत आहे, अशी टीका नवनीत राणा यांनी केली.

तसेच, उद्धव ठाकरेंचे निवासस्थान ‘मातोश्री’समोर हनुमान चालिसा म्हणण्याचा आग्रह केल्यानंतर आम्हाला जम्मू-काश्मिरातील लाल चौकात हनुमान चालिसा म्हणण्याचे सांगण्यात आले. मात्र, हेच नेते आज अयोध्येत रामभक्तीचे ढोंग करत आहेत, असे नवनीत राणा म्हणाल्या.

विधान परिषदेत ताकद दिसणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात जे काही पाप केले आहे, ते धुऊन काढण्यासाठीच शिवसेना अयोध्येत रामाचे दर्शन घेत आहे, अशी टीका आमदार रवी राणा यांनी केली. हनुमानभक्तीची ताकद राज्यसभा निवडणुकीत दिसून आली आहे. यापुढे विधान परिषद व मुंबई पालिकेतही आम्हा भक्तांची ताकद शिवसेनेला दिसेल. विधान परिषदेत मविआची ५० गुप्त मते भाजपला पडतील. या दोन्ही निवडणुकीत शिवसेनेचा दारुण पराभव होईल, असे राणा म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या