24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रआमचे जे काय आहे ते तोंडावर : मुख्यमंत्री शिंदे

आमचे जे काय आहे ते तोंडावर : मुख्यमंत्री शिंदे

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी आम्ही आनंद दिघे यांच्या विचारांनी चाललो असल्याचे सांगत शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. आम्ही शेतक-यांसाठी काम करणार असल्याचे सूतोवाच पुन्हा एकदा त्यांनी केले.

आपल्या पोटात एक आणि ओठात एक असे कधी आम्ही केले नाही, बाळासाहेबांचा आणि दिघेसाहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहेच. जनतेसाठी चांगले काम करणे हीच खरी दिघेसाहेबांसाठी श्रद्धांजली असेल असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी दिघे यांच्याबद्दलचे किस्से सांगितले. त्यांनी मला जेव्हा ठाणे महापालिकेचे सभागृह नेता केले तेव्हा ते बाहेरून विचारपूस करत मी काम कसे करतो आहे त्याबद्दल विचारायचे. एकनाथ कसे काम करतोय असे ते विचारायचे. आपला शिष्य कशा प्रकारे जबाबदारी पार पाडतोय याची ते माहिती घ्यायचे असे ते म्हणाले. आजही त्यांच्याच विचारांचा वारसा घेऊन आम्ही राज्याच्या विकासाचे काम पार पाडणार आहोत असे ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या