22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रहरीश साळवेंची फी किती?

हरीश साळवेंची फी किती?

एकमत ऑनलाईन

एकनाथ शिंदेंची बाजू मांडणारे
वकील हरीश साळवेंची फी किती?
नवी दिल्ली : शिवसनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या कायदेशीर लढाईत एकनाथ शिंदेंच्या बाजूने जगप्रसिद्ध वकील हरीश साळवे बाजू लढवत आहेत. तर महाविकास आघाडीच्या वतीने कपिल सिब्बल आणि मनु सिंघवी बाजू लढवत आहेत. आता हरीश साळवे यांची फी किती आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

हरीश साळवे यांचे नाव जगातील सर्वांत मोठ्या वकिलांमध्ये गणले जाते. गेल्या वर्षी हरीश साळवे यांनी कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकिली केली होती. या प्रकरणात त्यांनी फक्त १ रुपया फी घेतली. पण इतर वेळेस ते फक्त एकदम मोठी प्रकरणे घेतात आणि त्यात ते प्रत्येक तासाला काही लाख तर एका दिवसासाठी २५ ते ३० लाख रुपये फी घेत असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

हरीश साळवे यांचे नाव केवळ देशातच नाही तर जगातील सर्वांत मोठ्या वकिलांमध्ये घेतले जाते. १९८० मध्ये त्यांनी वकिलीला सुरुवात केली. १९९२ या वर्षात हरीश साळवे यांची दिल्ली उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली.

वकिली ही साळवे कुटुंबाची परंपराच आहे. त्यांचे वडील नंदकुमार पी. साळवे चार्टर्ड अकाउंटंट होते आणि इंदिरा गांधी-राजीव गांधी-नरंिसह राव यांच्या कारकि­र्दीत केंद्रीय मंत्री होते. हरीश साळवे वकिली करण्यापूर्वी चार्टर्ड अकाउंटंट होते. नानी पालखीवाला आणि सोली सोराबजी या कायदे पंडितांच्या हाताखाली अनेक वर्षे त्यांनी काम केले आहे. याआधी सलमान खान, मुकेश अंबानी, इटली सरकार आणि वोडाफोन अशा बड्या लोकांसाठी काम केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या