22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रहिंदुत्ववादी विचार सोडणा-यांचा दसरा मेळाव्यावर हक्क कसा?

हिंदुत्ववादी विचार सोडणा-यांचा दसरा मेळाव्यावर हक्क कसा?

एकमत ऑनलाईन

मुंबई : आगामी काळात होऊ घातलेल्या दसरा मेळाव्यावरून आतापासूनच वाद सुरू झाला आहे. राज्यात अभूतपूर्व घडामोडी घडवत एकनाथ शिंदे यांनी बंड करत मुख्यमंत्रीपद मिळवला. त्यामुळे शिवसेनेत उभी पडली. त्यानंतर शिवसेना कोणाची असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातच आता दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात संघर्ष होण्याचे चिन्हे आहेत.

शिंदे गटाचे नरेश म्हस्के म्हणाले की, हिंदुत्ववादी विचारसरणीचा दसरा मेळावा व्हायचा! आता ज्यांनी हिंदुत्ववादी विचार सोडला त्यांचा दसरा मेळाव्यावर हक्क कुठला? आम्ही हिंदुत्ववादी विचारांचे आहोत. त्यामुळे दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आमचा आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील.

हिंदुत्ववादी विचारसरणीचे सोने लूटण्यासाठी वाजतगाजत शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात सामील व्हा, अशा पद्धतीने दसरा मेळाव्याची सुरुवात व्हायची. आता हिंदुत्ववादी विचारसणीचे विचार कोणाचे आहेत. शिंदे नेतृत्व करत असलेले लोक हिंदुत्ववादी विचारसरणीचे आहे. जे दसरा मेळाव्यावर अधिकार सांगत आहेत, त्यांनी हिंदुत्ववादी विचारसरणीचे विचार सोडले आहेत. त्यामुळे दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आमचाच असल्याचे नरेश म्हस्के यांनी म्हटले.

बाळासाहेबांच्या विचारावरच आम्ही चालणार आहे. मात्र लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठी नवनवीन आरोप केले जातायत. मुंबई महाराष्ट्राबाहेर नेण्याचा प्रयत्न होतोय. शिवसेना भवनाचा ताबा घेणार आहेत, असा गोष्टी पेरण्याचे काम सुरू असल्याचा आरोप म्हस्के यांनी केला. याआधी आदित्य ठाकरे यांनी देखील दसरा मेळाव्यासंदर्भात विधान केले होते. शिवसेना मुंबईत वार्षिक दसरा मेळावा आयोजित करण्याची परवानगी मागत आहे, पण अधिकारी आमचा अर्ज स्वीकारत नाहीत. हे दडपशाहीचे सरकार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या