37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeमहाराष्ट्रपैसे काढायला गेल्यावर कार्ड ATM मध्ये अडकलं म्हणून मशीनच फोडलं....

पैसे काढायला गेल्यावर कार्ड ATM मध्ये अडकलं म्हणून मशीनच फोडलं….

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईत एटीएम मशिनमध्ये कार्ड अडकलं म्हणून एका तरुणाने थेट मशिनच फोडलं. मुंबईतील कांदीवली पूर्व लोखंडवाला सर्कलजवळ ही घटना घडली. याप्रकरणी त्या तरुणाला अटक करण्यात आली असून त्याची जेलमध्ये रवानगी करण्यात आली  आहे.

मालाड पश्चिम येथे राहणारा 26 वर्षीय संजय कुमार बुधवारी रात्री साडे 12 च्या सुमारास लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील सेंट्रिअम मॉलमधील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता. संजय कुमारने अनेकदा एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पैसे निघाले नाही. त्यानंतर त्याचं एटीएम कार्ड मशिनमध्ये अडकलं. अनेकदा प्रयत्न करुनही पैसे न निघाल्याने संजय कुमार संतापला होता.

Read More  वेदनादायी घटना : आईचा मृत्यू, सात दिवसाचं बाळ आईविना पोरकं

त्यात एटीएम कार्ड मशिनमध्ये अडकल्याने त्याचा पारा चढला आणि त्याने थेट मशिनच फोडलं. या घटनेची माहिती मिळताच समता नगप पोलिसांनी घटनास्थळ गाठत संजय कुमारला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याची जेलमध्ये रवानगी करण्याचे आदेश दिले. गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. संजय कुमारच्या घरी पैसे नव्हते. त्यामुळे तो एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता. मात्र, प्रयत्न करुनही पैसे न निघाल्याने त्याने थेट एटीएम फोडलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या