23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रआम्हाला जोतिबाची सावित्री कधी कळणार?

आम्हाला जोतिबाची सावित्री कधी कळणार?

एकमत ऑनलाईन

पुणे : वडाची पूजा करणारी सत्यवानाची सावित्री आम्हाला समजली मात्र स्वत:च्या अंगावर शेणाचे शिंतोडे उडवून घेणारी जोतिबाची सावित्री मात्र आम्हाला समजली नाही हीच आपल्या समाजाची शोकांतिका आहे. जोतिबांच्या सावित्रीचा संघर्ष आपल्याला माहिती आहे मात्र या संघर्षाला सावित्रीबाई सामो-या गेल्या म्हणून मी आज माझं मत मांडू शकत आहे, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले आहे. त्या पुण्यात बोलत होत्या.

माझा आणि वटपौर्णिमेचा फार संबंध आला नाही. लग्नानंतर एकदाही मी वडाची पूजा केली नाही. मी माझ्या साहेबांना सांगते, की मीच हवी असेल तर तुम्ही वडाला फे-या मारा. माझ्याकडून वडाची पूजा होणार नाही. माझ्या पतीनेदेखील मला कधी आग्रह केला नाही. माझ्या कुटुंबीयांनीदेखील मला तसा आग्रह केला नाही. उलट माझ्या पतीने माझ्या भावना समजून घेतल्या, असेही त्या म्हणाल्या.

वडाची पूजा करताना निसर्गाचा आणि पर्यावरणाचाही विचार महिलांनी करायला हवा. वडाच्या झाडापासून ऑक्सिजन जास्त मिळतो. त्यामुळे वडाचं झाडदेखील लावा हा संदेश दिला. मात्र दुर्दैवाने वटपौर्णिमेच्या दुस-या दिवशी जेव्हा वडाचं झाड बघतो तर झाड झुकलेल्या अवस्थेत दिसतं. अंधश्रद्धानिर्मूलन समितीच्या लोकांकडून त्या झाडाला या बंधनातून मुक्त करताना दिसतात, असे म्हणत त्यांनी सगळ्यांना पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.

ज्या महिला माझ्याकडे पतीने मारहाण केली किंवा दारू पितो अशी तक्रार घेऊन येतात. त्याच महिला मला वटपौर्णिमेला पूजा करताना दिसतात. त्यावेळी त्यांचं उत्तर असतं की कुटुंबीयांच्या किंवा समाजाच्या लाजेखातर ही पूजा करावी लागते. समाज काय म्हणेल याचा विचार आपण आधी करतो आहोत मात्र आपला पती कसा आहे, त्याच्यामध्ये कशी सुधारणा घडवून आणता येईल, याकडे अनेक महिला दुर्लक्ष करतात.

त्यामुळे हे मारहाणीचे आणि अत्याचाराचे प्रकार सातत्याने सुरू आहेत. ज्यादिवशी समाजाचा विचार करून महिला स्वत:त सुधारणा घडवून आणतील त्यादिवशी खरी सावित्री जागी होईल, असेही त्या म्हणल्या.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या