24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदे चूक की बरोबर, जनताच ठरवेल

शिंदे चूक की बरोबर, जनताच ठरवेल

एकमत ऑनलाईन

मुंबई : बंड करून शिवसेनेतून वेगळे झालेले एकनाथ शिंदे आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत. गेल्या जवळपास दोन अडीच महिन्यांपासून त्यांच्या या बंडाची चर्चा सुरूच आहे. एकीकडे ठाकरेंची शिवसेना शिंदे गटाला गद्दार म्हणवत आहे. तर दुसरीकडे त्यांच्याच मित्रपक्षात असलेल्या आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या एका विधानाची चर्चा होऊ लागली आहे.

एकनाथ शिंदे चूक की बरोबर हे जनताच ठरवेल, असे अजित पवारांनी म्हटले आहे. बारामतीमधल्या एका कार्यक्रमात अजित पवारांनी काल हे विधान केले आहे. अजित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी बंड करत शिवसेनेतला एक मोठा गट बाजूला काढला. या घटनेच्या मी खोलात जाणार नाही. लोकशाहीत अशा घटना होतच असतात. ते योग्य की अयोग्य हे सर्वसामान्य जनता निवडणुकीच्या माध्यमातून ठरवेल.

खरी शिवसेना कोणाची?
शिवसेनेतल्या अभूतपूर्व बंडानंतर महत्त्वाचे मंत्री आणि आमदारांसह एकनाथ शिंदे बाहेर पडले. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. अखेर या शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. हा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या