27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यसभेसाठी शिवसेना आमदारांना व्हीप जारी

राज्यसभेसाठी शिवसेना आमदारांना व्हीप जारी

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बैठकांना वेग आला आहे. राज्यसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत संपली. त्यानंतर आता निवडणूक होणार, हे देखील स्पष्ट झालं. त्यामुळे आमदारांना स्वत:कडे वळवण्यासाठी खलबतं सुरू झाली आहेत.

महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलं होतं. मात्र फडणवीसांनी काऊंटर ऑफर दिल्याने ही बोलणी फिस्कटली. यानंतर विविध अपक्षांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आज दिवसभर बैठकींचा सिलसिला सुरू राहणार आहे. दुपारी मंत्रिमंडळाची कोरोना संदर्भात बैठक आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्र्यांसोबत राज्यसभेचं समीकरण जुळवून आणण्यासाठी बैठक घेणार आहे. आणि संध्याकाळी मुख्यमंत्री राज्यातील अन्य अपक्ष आमदारांसोबत बैठक घेणार असून त्यांचं मन वळवण्याचं काम सुरू आहे.

आमदारांसाठी हॉटेल बूक
महाविकासआघाडीने त्यांची मतं फुटू नये यासाठी हॉटेल बूक केलं आहे. सर्व आमदारांना याच ठिकाणी ठेवणार असल्याचं समोर आलंय. शिवसेनेने देखील सर्व आमदारांना बॅग भरून वर्षावर बैठकीला येण्याचं सांगितलं आहे. वर्षावर मुख्यमंत्री सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या