36.1 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमहाराष्ट्रशेतक-यांशी चर्चा का टाळताय?

शेतक-यांशी चर्चा का टाळताय?

एकमत ऑनलाईन

अहमदनगर : निवडणुकीच्या वेळी मते मागायला शेतक-यांच्या बांधावर जाता, तर मग शेतक-यांचे आंदोलन सुरू असताना त्यांच्याशी चर्चा करायला का जात नाहीत? दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी पाकिस्तानातून आलेत का? उद्या जर हिंसा भडकली तर त्याला जबाबदार कोण? असे सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष करणा-या केंद्र सरकारला उद्देशून उपस्थित केले आहेत.

या आंदोलनाला हजारे यांनी पाठिंबाही व्यक्त केला आहे. कृषी कायद्यांच्या विरोधात सध्या पंजाब आणि परिसरातील शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. याच शेतकरी संघटना हजारे यांच्या लोकपाल आणि शेतक-यांच्या प्रश्नावरील आंदोलनाच्या वेळी दिल्लीत हजारे यांच्यासोबत आल्या होत्या. शेतकरी संयमाने आंदोलन करीत आहेत. यातून हिंसा भडकली तर याला जबाबदार कोण, असा सवाल करून हजारे यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका केली.

धामापूर तलावाला ‘वर्ल्ड हेरिटेज इरीगेशन साईट’ पुरस्कार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
167FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या