26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeमहाराष्ट्रइतकी जमीन खरेदी कशासाठी?

इतकी जमीन खरेदी कशासाठी?

किरीट सोमय्या : उद्धव ठाकरेंचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का?

एकमत ऑनलाईन

मुंबई: वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या कुटुंबियाकडून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या जमीन खरेदीवरुन भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. अन्वय आणि त्यांचे कुटुंबीय आणि रश्मी ठाकरे, मनीषा वायकर यांच्यात अनेक जमीन व्यवहार झाल्याचा आरोप सोमय्या यांनी पुन्हा एकदा केला आहे. ठाकरे कुटुंबाची जमिनीत इतकी गुंतवणूक कशासाठी? त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का? अशी विचारणा केली आहे.

नाईक-ठाकरे-वायकर कुटुंबाचे नेमके संबंध काय? वायकर आणि ठाकरे कुटुंबे कशाला एकत्र आली? जमीन खरेदी व्यवहारात अनेकदा संशयास्पद व्यवहार असतात, असे लोकांना वाटत असते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला जमीन खरेदी व्यवहाराची माहिती द्यावी, असे आवाहन सोमय्या यांनी केले आहे. उद्धव ठाकरेंचा जमीन खरेदीचा व्यवसाय आहे का? तसे असेल तर त्यांनी जनतेला सांगावे, असेही सोमय्या यांनी विचारले आहे.

प्रकरणाची चौकशी करण्याची भाजपची मागणी
वायकर आणि ठाकरे कुटुंबाने रायगडमध्ये जमीन खरेदी केली. त्यांनी आतापर्यंत असे किती व्यवहार केले आहेत? त्यांचे संयुक्तपणे किती व्यवसाय आहेत? असे प्रश्न सोमय्यांनी उपस्थित केले. ठाकरे-वायकर यांनी नाईक कुटुंबाशी केलेला व्यवहार जुना असताना फडणवीस सरकार असताना त्याबद्दलच्या चौकशीची मागणी का केली नाही? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सोमय्यांनी त्यावर स्थानिक लोक जमीन व्यवहारांची माहिती देत नाहीत. माझी सासुरवाडी रायगडमध्ये आहे. तिथे गेलो असताना व्यवहाराची माहिती मला मिळाली, असे उत्तर दिले.

वायकर यांच्याकडून सोमय्यांना प्रत्युत्तर
सोमय्यांनी केलेल्या आरोपांना शिवसेनेचे नेते रविंद्र वायकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोणी कोणाकडून जमीन खरेदी करू नये का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन खरेदी केली. त्याची माहिती आम्ही आयकर विभागाला, निवडणूक आयोगाला दिली. पार्टनरशिपमध्ये जमीन खरेदी करायला मनाई आहे का?’ असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला.

उत्तर प्रदेश, प. बंगालमध्येही ओवेसी निवडणूक लढवणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या