23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रकाल शपथविधीला बाळासाहेब ठाकरेंना का विसरलात ?

काल शपथविधीला बाळासाहेब ठाकरेंना का विसरलात ?

एकमत ऑनलाईन

मुंबई: शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंना विसरलात का? असा सवाल शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी बंडखोर आमदारांना केला. शिवसेनेशी बंडखोरी केलेल्या आमदारांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावरून अरविंद सावंतांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला. शिवसेना पक्षावर एकनाथ शिंदे यांनी दावा न सांगता त्यांना वेगळा पक्ष काढायचा असल्यास तो काढावा, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

पवारांच्या या वक्तव्याला दुजोरा देताना अरविंद सावंत म्हणाले, उद्धव ठाकरेदेखील हेच सांगतायत. त्यांना बाहेर पडायचे आहे तर आमचे शिवसेनेचे नाव आणि चिन्ह सोडावे पण शिवसेना सोडण्याची या लोकांची हिंमत नाही. सत्तेसाठी खोटे बोलून उद्धव ठाकरेंवर धडाधड आरोप करत सुटलेत, अशी धारदार टीका अरविंद सावंत यांनी केली.

याच घराण्यामुळे आम्ही असामान्य झालो
शिवसेनेच्या ठाकरे घराण्यामुळेच असंख्य लोक सामान्यांचे असामान्य झाले, अशी आठवण अरविंद सावंत यांनी यावेळी करून दिली. ते म्हणाले, ‘ शिवसेनेचे आमदार काल शपथविधीच्या वेळी बाळासाहेब ठाकरेंचे नाव घ्यायला विसरले. त्यांच्यामुळेच आम्ही घडलो आहोत. ज्या घराण्यानं महाराष्ट्रातील सामान्य माणसांना असमान्य केले. आमच्यासारखे कारकून होते, ते आज मोठ्या पदावर पोहोचलेत. त्या घराण्याने स्वत:साठी काय घेतले . पहिल्यांदा त्या घराण्यातला एकजण आमदार होतोय. तो एक मुख्यमंत्री होतोय तर काय बिघडले का त्यांच्या पाठित सुरा खुपसला? असे काय खोटे बोलायचे? उद्धवजी भेटत नाहीत हे तर धादांत खोटे आहे.

‘महाराष्ट्रासाठी लांच्छनास्पद दिवस’
काल शिंदे आणि फडणवीस सरकारमधील १८ मंत्र्यांचा शपथविधी झाला. यातील काही मंत्र्यावर आरोप आहेत. यावरून अरविंद सावंत यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘ महाराष्ट्राला लांछन लागण्याचा दिवस होता. ९ ऑगस्टचा क्रांती दिन. ज्यांना चलेजाव म्हणायला पाहिजे होतं. त्यांचा शपथविधी झाला. कुणाच्या मुलीचं टीईटी घोटाळ्यात नाव आले आहेक़ुणावर महिलेवर अत्याचाराचे आरोप आहेत. देवेंद्र फडणवीसांचे संजय राठोडांवर पूर्वी केलेले भाष्य ऐका. त्यांना जे धुलाई मशीन नाव दिलंय ते अगदी योग्य आहे. काहीही करा, आमच्याकडे या पावन होतात. ही सगळी जनतेच्या मनातून उतरलेली माणसे आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या