22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeमहाराष्ट्रवानखेडे मुस्लिम आहेत हे सिद्ध करणा-यांची पाठराखण का?

वानखेडे मुस्लिम आहेत हे सिद्ध करणा-यांची पाठराखण का?

एकमत ऑनलाईन

मुंबई : आर्यन खान प्रकरणावरून सध्या राज्यात नवनवीन खुलासे आणि आरोप समोर येताना दिसत आहेत. क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान आणि इतरांवर कारवाई करत ताब्यात घेण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. दरम्यान यावरून विरोधी पक्षाकडून राज्य सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत.

भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीदेखील आता या प्रकरणात टीका केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारले आहेत. ‘सर्वज्ञानी जनाब संजयजी राऊत तुम्हाला समीर वानखेडे हा अधिकारी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी नसून मुस्लिम आहे हे सिद्ध करणा-यांची पाठराखण करण्याची का एवढी घाई लागलेली आहे ?,’ अशी विचारणा चित्रा वाघ यांनी केली आहे.

महाराष्ट्रात बरेचसे महत्त्वाचे प्रश्न आहेत. जसे की कोकणातील वादळग्रस्तांना मोबदला मिळालेला नाही. शेतक-यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत. मराठवाड्यात अतिवृष्टीने बेहाल झालेल्या शेतक-यांना मोबदला मिळत नाही. आरोग्य विभागात घोटाळा होत आहे. एमपीएससीच्या तरुणांचे भविष्य अंधारात ढकलले जात आहे. रोज राज्यातील लहान मुली-महिला यांच्यावर लैंगिक अत्याचार होत आहेत.

या सगळ्या विषयावरती आपल्याला भाष्य करायचे नाही. पण तुम्हाला एनसीबीसारख्या स्वायत्त संस्थेतील एखाद्या अधिका-याला त्याच्या जातीवरून टार्गेट करायचं आहे. त्यांच्यावर वैयक्तिक हल्ला करून त्याच्या कामावर फक्त दबाव आणायचा आहे,’ अशी टीका भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या