22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रराऊतांच्या अटकेवर शरद पवार का बोलत नाहीत?

राऊतांच्या अटकेवर शरद पवार का बोलत नाहीत?

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : संजय राऊत यांना काल सक्तवसुली संचलनालयाने रात्री उशीरा अटक केल्यानंतर शिवसेनेकडून भाजपला टीकेचे धनी बनवले जात आहे. दरम्यान या अटकेचे पडसाद राज्यसभेच्या पावसाळी अधिवेशनातही दिसून आले असून सभागृहातील गोंधळामुळे कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. त्याचबरोबर औरंगाबादचे बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी राऊतांच्या अटकेनंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना धारेवर धरले आहे.

शरद पवारांनी राऊतांना शिवसेना फोडण्यासाठी सुपारी दिली होती. पण राऊतांच्या अटकेनंतर ते त्यांच्याविषयी काहीच प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत, तोंडातून शब्द काढत नाहीत कारण आता शिवसेना संपलेली आहे, त्यांचे काम संपलेले आहे, आता तुझी मला गरज नाही असे पवारांना वाटते असा आरोप शिरसाठांनी केला.

दरम्यान, संजय राऊतांवर ईडीने केलेली कारवाई ही कोणाच्याही सांगण्यावरून केली नसून त्यांच्यावरील कारवाई योग्य असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले आहे.

राऊतांच्या अटकेनंतर उद्धव ठाकरे त्यांच्या कुटुंबियांना भेटायला चालले आहेत पण याच उद्धव ठाकरे यांनी जर प्रताप सरनाईक आणि यशवंत जाधव यांच्यासाठी वेळ दिला असता तर शिवसेनेवर ही वेळ आली नसती आणि त्यांना जास्त आनंद झाला असता. संजय राऊतांनी शिवसेना फोडण्याचे काम केलं, तरीही त्यांना ईडीकडून अटक झाल्यावरही उद्धव ठाकरे त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीला जातात असे शिरसाठ म्हणाले.

संजय राऊतांवर जी कारवाई झाली त्यावर मागील काही दिवसांपासून काम चालू होते. या कारवाईसाठी राऊत तयार होते. त्यांनी याआधीही सांगितले होते की, मी ईडीला घाबरत नाही, मला अटक करायची असेल तर करा. त्यानंतर त्यांच्यावर झालेल्या कारवाईला त्यांनी ज्या प्रकारे तोंड दिलेले आहे त्याचे कौतुकच करावे लागेल परंतु अटक केली तरीही त्यांचे तोंड बंद झालेलं नाही ते महाराष्ट्रातील जनतेला आवडलेलं नाही. असं शिरसाठ म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या