बारामती : माझा नवरा वेशभूषा परिधान करून बाहेर जायचे असं एका नेत्याच्या धर्म पत्नीने सांगितले आणि तेच नेते म्हणत होते की यात आमचा काहीही संबंध नाही आहे, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या उपस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बारामतीतील राष्ट्रवादी भवन येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी मंत्रीमंडळाच्या विस्तारावर देखील भाष्य केलं.सध्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात धाकधूक असल्याने त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार देखील पुढे ढकलला आहे. ११ तारखे नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहे, असंही ते म्हणाले.
शिवसेनेचे सगळ्या बंडखोर आमदारांची चांगली ट्रिप झाली. त्या सगळ्यांना सुरत, गुवाहाटी बघायला मिळाली. मात्र आम्ही आमदारांच्या पाठीमागे उभं राहण्याचं ठरवलं होतं. त्यांना साथ द्यायची ठरवली होती आणि राहिलोसुद्धा उद्धव ठाकरेंनी त्या सगळ्यांता उल्लेख देखील भाषणात केला होता, असंही ते म्हणाले.
अनेकजण त्याच्या मुलाखतीत म्हणतात की आमचा आमदार संघ आम्ही बारामतीसारखा बनवून दाखवतो. बारामतीमध्ये चांगलं काहीतरी आणि वेगळं आहे म्हणूनच म्हणतात. कुणीही खालच्या पातळीवर जाऊन टीका करायची नाही अशा अजित पवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. तिकीट मिळाले नाही म्हणून विरोधकांना मदत करू नका,असंही ते म्हणाले.