25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeमहाराष्ट्रविकिपिडियाचा घोळ; शिंदे गटाचे आमदार भाजपमध्ये

विकिपिडियाचा घोळ; शिंदे गटाचे आमदार भाजपमध्ये

एकमत ऑनलाईन

मुंबई : गुगल सर्च रिझल्टमध्ये शिंदे गटाच्या चार मंत्र्यांना भाजपमध्ये दाखवण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गटातील मंत्री संदिपान भुमरे, उदय सामंत, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांच्या नावापुढे भारतीय जनता पार्टी असे दाखवण्यात येत आहे. दरम्यान, हा खोडसाळपणा कुणी केला असाही संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

भाजपमध्ये असल्याचे दाखवत असलेल्या या मंत्र्यांनी दोन दिवसापूर्वी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. दरम्यान, महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर अखेर पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. त्यामध्ये एकनाथ शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता विधिमंडळाचे अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. अधिवेशन संपल्यावर दुस-या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या