28 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeमहाराष्ट्रदिवाळीपूर्वी पगारासह बोनस देणार

दिवाळीपूर्वी पगारासह बोनस देणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिवाळीपूर्वीच एसटी कर्मचारÞ्यांना बोनस देणार असल्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर दोन महिन्यांचा पगारही एसटी कर्मचाºयांना देण्यात येणार असून, तीन महिन्यांपैकी दोन महिन्यांचा पगार देणार असल्याची मोठी घोषणा अनिल परब यांनी केली आहे. या महिन्याचा पगार तासाभरात जमा होणार असल्याचीही माहितीही अनिल परबांनी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळे संकटात असताना पैशांची राज्य सरकारकडे आवक कमी आहे. आपले उत्पन्न प्रवासी नसल्यामुळे बंद झाले आहे. त्यामुळे आपल्या वेतनाचा भार राज्य सरकार उचलेल यासाठी आपले पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. काळ थोडा कठीण आहे. पण त्यामुळे हताश होऊन टोकाचे पाऊल उचलू नका. हे तात्पुरते संकट आहे. त्यातून आपण मार्ग काढून एसटी कर्मचाºयांचे आयुष्य पूर्ववत करण्याचा आपण प्रयत्न करत असल्याचे अनिल परब यांनी म्हटले आहे.

कोणतेही टोकाचे पाऊल उचलल्यामुळे आपल्या कुटुंबावर त्याचा परिणाम होऊन कुटुंब रस्त्यावर येते. त्यामुळे असे काहीही करू नका, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. आर्थिक संकटातून जळगावमधील एका एसटी कर्मचाºयाने आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर अनिल परब यांनी दुपारी तातडीने पत्रकार परिषद घेऊन दिवाळीपूर्वी दोन महिन्यांचे वेतन देण्याची घोषणा केली आहे.

नाईक ६ वर्षांपासून आर्थिक संकटात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या