33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home महाराष्ट्र अर्णब गोस्वामी यांच्याकडे संवेदनशील माहिती कशी आली याची चौकशी करणार !

अर्णब गोस्वामी यांच्याकडे संवेदनशील माहिती कशी आली याची चौकशी करणार !

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी) रिपब्लिक टीव्ही चे प्रमुख अर्णब गोस्वामी व ‘बार्क’ चे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हाट्सअँप संभाषणातून अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. बालाकोट हल्ल्याबाबतची अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती तीन दिवस आधी त्यांच्यापर्यंत कशी पोचली होती याची चौकशी करण्याचे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिले. बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मंगळवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अर्णब गोस्वामीना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली.

प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अर्णब गोस्वामीवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी सावंत यांच्याबरोबर प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, गजानन देसाई, विनय खामकर हेही उपस्थित होते. गृहमंत्री देशमुख यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून चौकशीबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगितले.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालकोट येथील दहशतवादी तळ भारतीय हवाई दलाने उध्वस्त केला होता. ही माहिती गोस्वामी याना तीन दिवस आधी म्हणजे २३ फेब्रुवारी २०१९ रोजी कशी काय मिळाली असा सवाल सावंत यांनी केला. संरक्षणविषयक महत्वाची माहिती बाहेर येणे हे अत्यंत गंभीर असून लष्करी कारवाई संदर्भातील माहिती बाहेर कशी आली, ही माहिती गोस्वामी या पत्रकाराला २३ फेब्रुवारी २०१९ रोजी कशी काय मिळाली, त्याने अजून कोणाला ही माहिती दिली का ? अर्णबने स्वतः सांगितले आहे की ज्याने त्याला ही माहिती दिली तो मोदी सरकारमधील मोठा व्यक्ती आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे. अर्णब गोस्वामी यांचे कृत्य गोपनीयतेच्या कायद्याचा भंग करणारे आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जावी. महाराष्ट्र सरकारने अर्णब गोस्वामीना तात्काळ अटक करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

गोस्वामी आणि त्यांच्या रिपब्लिक टीव्हीने अनेक बेकायदेशीर कृत्यं केली असून दूरदर्शनची सॅटेलाईट फ्रिक्वन्शी बेकायदेशीर वापरून प्रसार भारतीचे करोडो रुपयांचे नुकसानही केले आहे. रिपब्लिक टीव्हीने दूरदर्शनला पैसै न देता त्यांच्या फ्रिक्वन्सी वापरणे हा गुन्हा आहे. टीआरपी घोटाळ्यात अडकलेल्या टीव्हीने सरकारी मालकीच्या दूरदर्शनच्या फ्रिक्वन्सी वापरून टीआरपी वाढवण्याचा खटाटोप केलेला आहे. टीआरपी घोटाळ्याची चौकशी करताना या बेकायदेशीर कृत्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. दूरदर्शनने माहिती व प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली असता राठोड यांनी ती तक्रार बाजूला ठेवली असे या संभाषणात दिसून येत आहे. याचाच अर्थ मोदी सरकारचा गोस्वामीला मोठा पाठिंबा आहे. परंतु हा जनतेचा पैसा लुबाडला असल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडून याची चौकशी करावी अशी मागणी सावंत यांनी केली.

नागपुरात ४४ डॉक्टरांची लसीकरणाकडे पाठ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या