21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रशक्य असेल तेथे आघाडी करणार

शक्य असेल तेथे आघाडी करणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : आगामी काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होऊ घातल्या आहेत. यामध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वच पक्षांसाठी महत्त्वपूर्ण मानली जाते. तर पुण्यासह इतर महापालिकांच्या निवडणूका देखील होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी होणार का, यावर जयंत पाटील यांनी जिल्हास्तरावर शक्य असेल तेथे आघाडी करणार असल्याची भूमिका स्पष्ट केली.

आघाडीतील घटक पक्षांशी स्थानिक पातळीवर बोलण्याचे अधिकार जिल्हाध्यक्षांना दिले आहेत. त्यामुळे जिल्हास्तरावर शक्य असेल तिथे आघाडी करण्याचा निर्णय आमचा झाल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच काँग्रेसचे अशोक चव्हाण आमच्यासोबत आहेत. त्यांची भूमिका एकत्रित जाण्याची असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुंबईत आल्यावर त्यांची भूमिकाही सुसुत्र होईल, असेही पाटील यांनी नमूद केले.

शिवसेनेने विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदी आमदार अंबादास दानवे यांची निवड केल्यानंतर महाविकास आघाडीत नाराजीचा सूर उमटला आहे. आम्हाला या निवडीवेळी विश्वासात घेतले नसल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. तर आमची नैसर्गिक आघाडी नाही, ही तात्पुरती आघाडी आहे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत.

त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, शिवसेनेत बंडाळी झाल्यापासून महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे एकला चलो रेचे धोरण पहायला मिळत. मात्र जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय होतील असे म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या