22.3 C
Latur
Wednesday, August 17, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदे सरकारच्या काळात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार?

शिंदे सरकारच्या काळात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार?

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजपा एकत्र येऊन सरकार बनविणार आहेत. राज्याचे लक्ष लागून असलेला मोठा प्रश्न तो म्हणजे इंधन दर कपातीचा, यावर शिंदे आणि फडणवीस काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

दिवाळीमध्ये पंतप्रधान मोदींनी पेट्रोल, डिझेलवरील अबकारी कर कमी केला होता. मात्र, ठाकरे सरकारने जीएसटी परतावा दिलेला नाही, यामुळे पेट्रोल, डिझेलवरील कर कमी होणार नाही, अशा शब्दांत कर कपात फेटाळली होती. यामुळे इतर राज्यांत १५-२० रुपयांनी इंधनाचे दर कमी झाले तरी राज्यात मात्र, केंद्राच्याच दर कपातीवर समाधान मानावे लागले होते.

पुन्हा दोन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने अबकारी कर कमी केला, तेव्हा देखील तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात व्हॅट कपात करण्यास नकार दिला. मोदींना राज्यांनाही कर कपात करण्याचे आवाहन केले होते. केंद्राच्या दर कपातीवर राज्याचा जो कर कमी झाला तीच आपली दरकपात असल्याचे भासविले होते.

दोन्ही वेळेला देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर दर कपात न केल्याने टीका केली होती. यामुळे शिंदे-फडणवीस राज्यातील पेट्रोल डिझेलचे जादाचे दर कमी करतात का? जनतेवरील महागाईचा बोजा कमी करतात का? शिंदे-भाजपा सरकार स्थापन झाल्या झाल्या जनतेला दिलासा देतात का? याकडे सा-यांचे लक्ष लागले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या