24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeमहाराष्ट्रचौथीपर्यंतच्या शाळा सुरू होणार?

चौथीपर्यंतच्या शाळा सुरू होणार?

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या तर ग्रामीण भागात पाचवी इयत्तेपासूनच्या शाळा २० ऑक्टोबरपासून सुरू झाल्या आहेत. त्यानंतर आता पहिली ते चौथीचे वर्गही सुरू व्हावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे मुख्यमंत्री, टास्क फोर्ससोबत चर्चा करून त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.

आदर्श शाळा योजना राबविण्यासंदर्भात शुक्रवारी मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळादेखील सुरू होण्याचा मुद्दा उपस्थित झाला. या बैठकीत जवळपास सगळ्याच जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्यावर जोर दिला. मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि कोविड टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे सांगितले.

जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक विकास करून आदर्श शाळा योजना राबविणे आणि निजामकालीन शाळांचा विकास करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिका-यांनी पुढाकार घ्यावा. शाळांच्या पायाभूत सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे शासनाचे उद्दि­ष्ट असल्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

निजामकालीन शाळांचा विकास आणि आदर्श शाळा योजनेबाबत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी, प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक टेमकर, पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष वैदही वाढाण आदीसह सर्व जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

निजामकालीन शाळा विकासाला गती द्या
शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या, प्रत्येक जिल्ह्यात आदर्श शाळा योजनेची आणि संबंधित जिल्ह्यांमध्ये निजामकालीन शाळांच्या विकासाच्या कामांची अंमलबजावणी तातडीने होणे गरजेचे आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे लसीकरण पूर्ण करण्यात यावे, काही अडचणी असल्यास त्या सोडविण्यास सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

कर्मचा-यांचे लसीकरण, तात्काळ अहवाल द्या
अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा म्हणाल्या, आदर्श शाळा योजनेसंदर्भात आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, आयसीटी आणि विज्ञान प्रयोगशाळा यांचा समावेश असणार आहे. दरम्यान, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांच्या लसीकरणासंदर्भातील अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या