26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमहाराष्ट्रशुक्लांना आरोपी करणार का?

शुक्लांना आरोपी करणार का?

एकमत ऑनलाईन

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबई पोलिस आरोपी करणार आहे का? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला अन्यथा ही याचिका उगाच ऐकत बसून कोर्टाचा वेळ वाया घालवू नका, अशी नाराजी व्यक्त करत याबाबत सोमवारपर्यंत खुलासा करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

मुंबई पोलिसांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि त्याबाबतचा गोपनीय अहवाल लिक करणे यासंबंधी मार्चमध्ये फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अटक होण्याच्या शक्यतेमुळे शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. आतापर्यंत या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासाचा अहवाल सोमवारी होणा-या पुढील सुनावणीत हायकोर्टात दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

मुंबई पोलिसांनी अद्याप शुक्ला यांना आरोपी केलेले नाही. मात्र, सध्या तपास सुरू आहे, असे आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलेले आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील दरायस खंबाटा यांनी हायकोर्टाला दिली. जर शुक्ला यांना आरोपी केलेले नसेल आणि त्यांना पोलिस आरोपी करणार नसतील तर याचिकेवर सुनावणी घेऊन वेळ वाया घालवणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे जेव्हा त्यांना आरोपी केले जाईल, तेव्हा त्या पुन्हा न्यायालयात याचिका करू शकतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या