मुंबई : आमच्याकडे शिवसेनेचे एकूण ४० आमदार झाले आहे. ही संख्या आणखी वाढणार आहे. यामुळे खरी शिवसेना आमची आहे. तेव्हा व्हिपचे उल्लंघन करून विरोधात मतदान करणा-या आमदारांवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
दोन दिवसीय विशेष अधिवेशन पार पडल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. आज झालेल्या बहुमत चाचणीत महाविकास आघाडीला शंभरीही गाठता आली नाही. शिंदे आणि भाजप सरकारला १६४ तर मविआला ९९ मते मिळाली. आज एक आमदार आमच्या बाजूने आला. यामुळे आमची संख्या वाढली आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.