25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeमनोरंजनकंगनाच्या ऑफिसवर बीएमसी चा हाथोडा

कंगनाच्या ऑफिसवर बीएमसी चा हाथोडा

एकमत ऑनलाईन

मुंबई:  तोडफोडीला प्रत्यक्ष सुरूवात झाली; बंगल्याच्या बाहेरून तोडफोडीचे आवाज येत असल्याची माहिती आहे. आता प्रत्यक्ष जेसीबी त्या ठिकाणी आला असून कंगणा-या कार्यालयाची तोडफोड करण्यास सुरूवात झाली आहे. यावेळी कंगना थांबलेली नसून तिने पुन्हा एकदा ट्विट करून मुंबई पोलिसांना पाकिस्तान आणि पीओकेशी तुलना केली असल्याने संताप व्यक्त होत आहे. मुंबई पोलिस आणि मुंबई महानगर पालिकोचे कर्मचा-यांचे फोटो पोस्ट करून बाबर सेना अस ट्विट तिने केल आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून आणि अमली पदार्थांच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि पोलिसांवर टीका करणाऱ्या आणि मुंबईची पीओकेशी तुलना करून अवमान करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौतला मुंबई महानगरपालिकेने आज दणका दिला आहे. कंगनाच्या मुंबईतील पाली हिल येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्याच्या कारवाईस मुंबई महानगरपालिकेने सुरुवात केली आहे.

मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या कार्यालयाबाहेर काल नोटीस लावली होती. कार्यालयात अवैध बांधकाम करण्यात आलं असून, रहिवासी भागाचा कार्यालयीन वापर करण्यात आल्याचं नोटिशीत नमूद करण्यात आलं होतं. अधिनियम ३५४ अ अंतर्गत नोटीस लावण्यात आली होती. या नोटिशीची मुदत २४ तास होती. ती आज सकाळी साडे दहा वाजता संपली. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर कंगनाच्या कार्यालयाच्या गेटचे कुलूप तोडून कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत भाग तोडण्यास सुरुवात करण्यात आली.

प्राथमिक माहितीनुसार कंगना हिने आपल्या बंगल्यात 14 ठिकाणी नियमबाह्य बांधकाम करण्यात आल्याचे पालिकेने म्हटले आहे. तळमजल्याजवळील शौचालयाच्या जागेत ऑफिससाठी केबिन, स्टोअर रूममध्ये अनधिकृतपणे स्वयंपाकघर, जेवणासाठी अनधिकृतपणे जागा तयार, जिन्याजवळ आणि तळमजल्याजवळच्या पार्विंष्ठग लॉटमध्ये दोन अनधिकृत शौचालये बांधली, पहिल्या मजल्यावर अनधिकृतपणे केबिन, देवघरातच बैठकीसाठी रूम, स्लॅब टाकून अनधिकृत शौचालय, पहिला मजला अनधिकृतपणे वाढवला, दुसर्‍या मजल्यावरील जिन्याच्या रचनेत बदल, बाल्कनीत फेरफार, स्लॅब टाकून मजल्याचा उभा विस्तार, शौचालय तोडून त्या जागेचा इतर गोष्टींसाठी वापर, बाजूच्या बंगल्यातील एक बेडरूम पार्टिशन तोडून स्वत:च्या बंगल्यात सामावून घेतला, बंगल्याच्या मुख्य गेटची दिशा बदलली.

कार्यालयावरील कारवाई पुढे ढकलण्याची विनंती कंगनाच्या वतीनं करण्यात आली होती. मात्र ही कारवाई पुढे ढकलण्यास पालिकेनं नकार दिलेला आहे. त्यामुळे कंगनाच्या कार्यालयावर कारवाई होणार हे निश्चित झालेलं आहे. यावरून कंगनानं एका ट्विटच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. ‘मी मुंबई दर्शनासाठी तयार आहे. विमानतळाच्या दिशेनं निघाले आहे. महाराष्ट्र सरकार आणि त्यांचे गुंड माझ्या कार्यालयाबाहेर जमा झाले आहेत. ते माझं कार्यालय अनधिकृतपणे पाडण्याच्या तयारीत आहेत. मी महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेसाठी माझं रक्तही देण्यास तयार आहे. त्यापुढे हे काहीच नाहीच,’ असं ट्विट कंगनानं केलं आहे.

कंगनानं कार्यालयात बांधकाम करताना मुंबई महापालिकेच्या अधिनियम ३५४ अ चं उल्लंघन केल्याचं पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पालिकेच्या नोटिशीत सात मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. इमारतीचं बांधकाम पालिकेच्या नियमानुसार झालेलं नाही. दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचं बांधकाम अनधिकृतपणे करण्यात आलं आहे. नकाशात बेडरुमसोबत शौचालयं दाखवण्यात आलं होतं. कागदपत्रांत शौचालयं दाखवण्यात आलेली जागा प्रत्यक्षात मात्र ये-जा करण्यासाठी वापरण्यात आली आहे, असं पालिकेनं नोटिशीत म्हटलं आहे.

पालिकेच्या नोटिशीत एक छायाचित्रदेखील आहे. कार्यालयात कोण कोणता भाग कागदपत्रांनुसार अयोग्य आहे, ते या छायाचित्रात दाखवण्यात आलं आहे. अभिनेत्री जानेवारीत कंगनानं या मालमत्तेचे नुतनीकरण करून तिथे कार्यालय स्थापन केलं. मात्र, या जागेचा निवासी वापर बदलून व्यावसायिक केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आलं आहे. सोमवारी केलेली पाहणी आणि मंजूर आराखड्याच्या आधारे पालिकेचे पथक दोन दिवसांत अहवाल तयार करणार आहे. त्यानंतर लगेचच पुढील कारवाई निश्चित करण्यात येईल, असं पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत घोटाळा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या