25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeमहाराष्ट्र१५ ते २५ मेदरम्यान ओसरणार लाट?

१५ ते २५ मेदरम्यान ओसरणार लाट?

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात कोरोना लाटेने कहर केला आहे. त्यात दुस-या लाटेने अधिक धास्ती वाढविली आहे. परंतु आता राज्यातील रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. राज्यात रविवारी रुग्णसंख्या ५६ हजार होती. ही संख्या अशीच स्थिर राहिली किंवा खाली येऊ लागली तर हा आलेख खाली येतोय, असे म्हणावे लागेल. दरम्यान, जगातील इतर देशांच्या अभ्यासानुसार कोरोना ९० दिवसांनी कमी होत असतो. त्यामुळे १५ ते २५ मेदरम्यान कमी होताना दिसेल, असे मत राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले.

कोरोनाच्या प्रसाराबाबत आता सकारात्मक माहिती समोर येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कोरोनाचा प्रसार थांबताना दिसेल, असेही ते म्हणाले. राज्यात १६ फेब्रुवारी रोजी अमरावतीत कोरोनाचा रुग्ण आढळला. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार ९० दिवसांनी कोरोना कमी होत असेल, तर आता राज्यातील लाट ओसरण्यास मदत होईल, असे डॉ. लहाने म्हणाले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील १२ जिल्ह्यांतील कोरोनाची रुग्णसंख्या ओसरत असल्याचे आज म्हटले आहे. ही आकडेवारी पाहता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे संकेत मिळत आहेत. राज्यातही रुग्णसंख्या घटली असून, अनेक ठिकाणी नव्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनावर मात करणा-या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी टास्क फोर्सच्या सदस्यांनी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली होती. साथीच्या रोगांमध्ये व्हायरसची ताकद सतत वाढत असते. व्हायरस आपल्यात बदल करत असतो. यामुळे कोरोनाच्या आणखी किती लाटा येतील, हे आज सांगू शकत नाही. कितीही लाटा आल्या तरी महाराष्ट्र खंबीर आहे. पुरेशी तयारी आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी आपण तयारी केली आहे, असेही डॉ. लहाने यांनी सांगितले. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तयारीही केलेली आहे.

राज्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ७ लाखांवर गेली असली, तरीही सरकारने ऑक्सीजन, बेड आणि व्हेंटिलेटरची योग्य व्यवस्था केलेली आहे. कोरोना रुग्णांचे आकडे लपवायचे नाहीत, असे आम्हाला आदेश आहेत. एखाद्याचा अपघाती मृत्यू झाला आणि तो कोरोनाबाधित असेल, तर त्याचा मृत्यू कोरोनाबाधित म्हणून दाखविला जातो. कोणतीही लपवाछपवी केली जात नसल्याचे डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले.

देशात आढळले १ हजार स्ट्रेन
देशात ५ नव्हे, तर १ हजार स्ट्रेन आढळले आहेत. आपल्याला हे स्ट्रेन जास्त संसर्ग वाढविणारे आहेत का, हे आपल्याला बघायचे आहे. तसेच हे स्ट्रेन शरीरावर परिणाम करणारे आहेत का, हेही पाहायचे आहे. असे स्ट्रेन प्रत्येक तीन महिन्यांनी आढळतात. त्यामुळे या नव्या स्ट्रेनचा अभ्यास सध्या सुरू आहे, अशी माहितीही डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.

दुस-या लाटेत तरुणांत संक्रमण
कोरोनाच्या पहिल्या लाटेत साधारणपणे ५० वयाच्या वरील लोकांना संक्रमण झाले होते. मात्र, दुस-या लाटेत तरुण लोक जास्त प्रमाणात संक्रमित झाल्याचे दिसून येत आहे. वाढता धोका लक्षात घेता आता १८ वर्षांपर्यंत लसीकरण होणार आहे. त्यामुळे त्यांना संरक्षण मिळणार आहे. राहिलेले १२ ते १८ वयोगटातील मुले तिस-या लाटेत बाधीत होऊ शकतात, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

मराठवाड्यात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या