22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeमहाराष्ट्रपुण्यात गारठा वाढला

पुण्यात गारठा वाढला

एकमत ऑनलाईन

पुणे : परतीच्या पावसाने माघार घेताच थंडीचे आगमन ऑक्टोबर अखेर झाले आहे. सर्वसामान्य पणाने नोव्हेंबर मध्ये थंडीचे आगमन होत असते. कारण ऑक्टोंबर हिट जाणवत असते. गेल्या काही वर्षांपासून मात्र चित्र वेगळेच दिसते आहे.

राज्याच्या विविध भागांतील जिल्ह्यात रात्रीच्या किमान तापमानात घसरण झाली आहे.त्यामुळे वातावरणातील गारवा आपोआप वाढला आहे.तर काही भागात दुपारच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ झाली आहे. असे असले तरीही सरासरीच्या तुलनेत तापमानात फार मोठा फरक पडला नाही. काही भागांत दिवसा देखील गारवा जाणवत आहे.

सर्वसामान्य पणाने ऑक्टोंबर हिट चांगलीच जाणवत असते. पण याचा अनुभव यंदाही आला नाही. परतीचा पाऊस माघारी फिरताच थंडीचे आगमन झाले आहे. यावर्षी राजस्थान मधून २० सप्टेंबरला पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. आणि साधारण महिनाभरात पाऊस देशभरातून माघारी फिरला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या