27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रटिटवाळा रेल्वे उड्डाणपुलाचे काम बंद पडणार

टिटवाळा रेल्वे उड्डाणपुलाचे काम बंद पडणार

एकमत ऑनलाईन

कल्याण : मध्य रेल्वेच्या टिटवाळा रेल्वे उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर असताना रेल्वेकडून आवश्यक निधी उपलब्ध न झाल्याने महत्त्­वपूर्ण प्रकल्प बंद पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मध्य रेल्वे आपली सेवा वेगवान करण्यासाठी रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करत तेथे उड्डाणपूल बनविण्याचे नियोजन करत आहे.

केडीएमसी आणि रेल्वेच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली-ठाकुर्ली दरम्यान, त्यानंतर आंबिवली आणि शहाडदरम्यान वडवली फाटकानंतर, टिटवाळाजवळ रेल्वेस्थानकाच्या मुंबईच्या दिशेने फाटक क्रमांक ५१ जवळ उड्डाणपूल बनविण्याचा निर्णय घेण्यात आला.

हा उड्डाणपूल बनल्यास शहापूर आणि नाशिककडे जाणारा पर्यायी मार्ग होणार असल्याने केडीएमसी आणि रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या पुलासाठी ५०-५० टक्के खर्च करण्­यात येणार आहे.

या उड्डाणपुलाला रेल्वेने १७ जानेवारी २०२० रोजी मान्यता दिल्याने कामाला सुरुवात झाली असून, रेल्वे रुळावरील उड्डाणपुलाचे काम रेल्वे, तर पोहच रस्त्याचे काम केडीएमसी करणार असून ते काम ३० टक्के पूर्ण झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या