27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमहाराष्ट्रयशवंत सिन्हा यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी

यशवंत सिन्हा यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी

एकमत ऑनलाईन

मुंबई : विरोधी पक्षांच्या संयुक्त आघाडीचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

यशवंत सिन्हा यांनी आपली राष्ट्रपतिपदाची उमेदवारी मागे घ्यावी, अशी मी त्यांना विनंती करतो. देशातील सर्वच पक्षांतील अनुसूचित जाती, आदिवासी आणि दलित सदस्य द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत आहेत. त्यामुळे यशवंत सिन्हा यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

दरम्यान, १८ जुलै २०२२ रोजी देशात राष्ट्रपतिपदाची निवडणूक होणार आहे. यशवंत सिन्हा यांच्या विरोधात भाजपाकडून द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी देण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या