18.5 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeमहाराष्ट्रदुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरले

दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरले

एकमत ऑनलाईन

यवतमाळ : हॉटेलमधून जेवण करून परत जात असलेल्या दोघांची जुन्या भांडणातून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना १२ ऑक्टोबर रोजी आर्णी मार्गावरील पल्लवी लॉनसमोर घडली. या दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ शहर हादरले आहे. वसीम पठाण (३६), उमेश तुळशीराम येरमे (३४) अशी मृतांची नावे आहेत.

या प्रकरणी अवधूतवाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने अवघ्या ६ तासांत सर्व ६ आरोपींना अटक केली आहे. छोटू अनवर खा पठाण (५४) रा. नेताजीनगर, निरज वाघमारे (३३) रा. मधुबन सोसायटी, अब्दुल रहेमान अब्दुल जब्बार शेख (२८) रा. नेताजीनगर, नितीन पवार (२४) रा. वडगाव, नीलेश उईके (२२) रा. लोहारा अशी अटकेतील मारेक-यांची नावे आहेत. यापैकी मृतक वसीमचे अब्दुल रेहमान व छोटू पठाणसोबत काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. तेव्हापासूनच वसीमला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. १२ ऑक्टोबर रोजी वसीमला फोन करून बोलवण्यात आले. यावेळी वसीम त्याचा मित्र मृतक उमेशलाही सोबत घेऊन गेला होता. त्याने घरी निरज वाघमारे यांनी आयोजित केलेल्या पार्टीला जात असल्याचे सांगितले होते.

त्यानंतर रात्री ११.३० वाजता वसीम व उमेशची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा फोन घरी आला. वसीमची पत्नी निखत वसीम पठाण (२७) रा. नेताजीनगर, यवतमाळ हिने अवधूतवाडी पोलिस स्टेशनला निरज वाघमारे, अब्दुल रहेमान अब्दूल जब्बार शेख रा. नेताजीनगर, नितीन पवार, अभिनव शेंडे, निलेश उईके यांनी संगनमत करून जुन्या वादातून धारदार शस्त्राने पती व त्याच्या मित्राचा खून केल्याची तक्रार अवधूतवाडी पोलिस स्टेशनला दिली. त्यावरुन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. तसेच घटनास्थळ गाठून पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील शासकीय रुग्णालयात आणले. पोलिसांनी तत्परतेने तपासाची चक्रे फिरवली आणि सहाही मारेक-यांना अटक केली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या