24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रविदर्भाला येलो अ‍ॅलर्ट

विदर्भाला येलो अ‍ॅलर्ट

एकमत ऑनलाईन

पुणे : सध्या राज्यात गणेशोत्सवाची धूम सुरु आहे. याच कालावधीत मुंबई हवामान केंद्राकडून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवण्यात होता. दरम्यान, आता पुढील चार ते पाच दिवसांत राज्यात पावसाचा जोर कमी असणार आहे अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असून १ सप्टेंबरपासून राज्यातील काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्याच्या विविध भागात पाऊस होणार आहे. अकोला, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये पावसाची शक्यता असून या भागांना येलो अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे वेळेनुसार शेतीच्या कामांचे नियोजन करावे असा सल्लाही हवामान खात्याने दिला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना हा अ‍ॅलर्ट जारी केल्याने सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही प्रदेशात आजही पावसाचा जोर कायम राहणार आहे. मात्र, या दिवशी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. मुंबईत गुरूवारी कमाल तापमान ३३ आणि किमान तापमान २६ अंश सेल्सिअस असणार आहे. यावेळी आकाश ढगाळ आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवेचा दर्जा निर्देशांक चांगल्या श्रेणीत ३१ वर नोंदवला गेला आहे.

ऐन सणासुदीत पावसाच्या सरी
पुण्यात कमाल तापमान २९ तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. यावेळी ढगाळ वातावरण असेल तर हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक समाधानकारक श्रेणीत ५५ वर नोंदवला गेला आहे. पश्चिम घाटासह कोकणात या पावसाचा तुलनेत परिणाम कमी दिसेल अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ऐन सणासुदीला पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या