18.5 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeमहाराष्ट्रमराठवाड्यात यलो अ‍ॅलर्ट जारी

मराठवाड्यात यलो अ‍ॅलर्ट जारी

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यभरात पावसाची संततधार सुरु असून, मुंबई, कोकण, मराठवाड्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. अशातच राज्यात पुढील तीन दिवस सर्वत्र वादळी वा-यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यात प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला जातक आहे.

पश्चिम बंगालच्या उपसागरातील कमी दाब्याच्या क्षेत्रांमुळे देशात पावसाचा कालावधी लांबला आहे. सप्टेंबर मध्यानंतर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होतो. मात्र यंदा सप्टेंबर महिना संपत आला तरी राज्यभरात मुसळधार पावसाची सरी कोसळत आहेत. त्यामुळे राज्यभरात चांगला पाऊल बघायला मिळत आहे. यात राज्यातही पुढील तीन दिवस मुळसधार पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे.

‘या’ तीन जिल्ह्यांना सतर्क तेचा इशारा
मराठवाड्यातील प्रामुख्याने उस्मानाबाद, लातूर आणि नांदेडमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावासाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या तिन्ही जिल्ह्यांसाठी यलो अ‍ॅलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तसेच मुसळधार पावसासह वा-यांचा वेग अधिक वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात आज दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात २४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान देखील सर्वत्र पावसाच्या सरी बरसणार आहेत.

मुंबईत मुसळधार
मुंबईतही पुढील तीन दिवस चांगल्या पावसाचा अंदाज व्यÞक्त केला जात आहे. मुंबईत ऊन-पावसाचा खेळ रंगला असून, पुढील काही दिवस मुसळधार पाऊस कायम राहणार असे स्पष्ट केले. यात काल रात्रीपासून मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सर्वत्र मुंबईभर मुसळधार पावसाने दमदार बँंिटग केली. मात्र दुपारपासून पावसानी थोडी उसंती घेतली आहे.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या