मुंबई : मुंबईतील कुर्ला येथे दोन दिवसांपूर्वी नाईकनगर परिसरातील चार मजली इमारत दुर्घटनेमध्ये एकूण १९ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून यापूर्वी ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर एकनाथ शिंदे गटाकडूनही ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. इमारत दुर्घटनेत मृत पावलेल्यांपैकी काही यूपी-बिहारमधीलही होते.
त्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमींबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मृत आणि जखमींसाठी आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.