35 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमहाराष्ट्रतुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही; देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र

तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही; देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र

एकमत ऑनलाईन

मुंबई : जनतेला उत्तरदायित्व असलेला भाजप एकमेव पक्ष आहे. राज्यात १५ लाख लोक कोरोनाग्रस्त आहेत. मात्र राज्यात केवळ बदल्यांचा एकच धंदा सुरु आहे. प्रेताच्या टाळूवरचे लोणी राज्यकर्ता खात आहेत. कोरोनाचा बाजार केला आहे. मात्र केवळ तुम्ही म्हणजे महाराष्ट नाही तर राज्याची १२ कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र हे ठणकावून सांगतो, अशी जोरदार टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महाराष्ट्र प्रदेश भाजपची कार्यकारिणीची बैठक गुरुवारी पार पडली. बैठकीत फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर महिलांवरील अत्याचार, मराठा आरक्षण, कृषी कायदे अशा विविध मुद्द्यांवरुन टीका केली. कोरोना संकटात भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर आहे, एकही घरी बसलेला नाही असा अप्रत्यक्ष टोला फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. रोज महिलांवरील बलात्कार आणि अत्याचारामुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. कुणी बाहेरून येऊन आमच्या महाराष्ट्राला बदनाम करू शकत नाही. हाथरसच्या घटनेचा निषेध केलाच पाहिजे. मात्र राज्य, जात, समाज, राजकीय व्यवस्था पाहून रस्त्यावर उतरून विरोध म्हणजे बेगडीपणा आहे. राजस्थानमधल्या दलित मुलीबद्दल का नाही केलं आंदोलन, का नाही केलं ट्वीट? असा सवाल फडणवीस यांनी विचारला.

सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही
सरकारमध्ये समन्वय नाही. आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठा संताप आहे. केस दाखल केली नाही, म्हणून बेंचसमोर प्रकरण जाऊ शकत नाही आणि स्थगिती उठणार नाही. कधीकधी मला यांच्या मनातच काळंबेरं आहे, असे वाटते. सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही असे दिसतंय. भाजपने केलेला कायदा वैध नसता तर हायकोर्टात मान्य झालाच कसा? यांच्या नाकर्तेपणाचा ठपका भाजपच्या माथी मारण्याचे काम ते करत आहेत.

मराठा आणि ओबीसी समाजाला आमने सामने आणण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये ही भाजपची भूमिका आहे. महाराष्ट्र जळतो तेव्हा सरकार नाही सामान्य माणूस जळतो. आम्हाला हे उद्रेक नको आहेत.

एमपीएससीची परीक्षा झाली पाहिजे की नाही यावर मार्ग काढणे सरकारचे काम आहे. झुलवत ठेवणे सरकारचे काम नाही. इथे कोणी चर्चा करायलाच तयार नाही. हे सरकार नेमके चालवतय कोण हेच कळत नाही. आम्ही पोलिसांच्या माध्यमातून आंदोलने चिरडू असा पवित्रा सरकारचा आहे. राज्य सरकारने विधिमंडळाच्या अधिकारांचा वापर करून मार्ग काढायचा असतो.

शरद पवारांवरही टीका
शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात शेतीमाल कुठेही विकण्यावर बंदी नको. तसेच एपीएमसी मोडीत काढायला हव्या. हा शेतक-यांवर अन्याय आहे असे मत व्यक्त केले आहे. पवारांनी कृषी विधेयकाला कुठेच जाहीर विरोध केलेला नाही. त्यांनी फक्त राज्यसभेतील खासदारांच्या निलंबनाची निंदा केली. मात्र वरून ‘मॅडम’चा आदेश आल्यानंतर विरोध करण्यास भाग पडत आहेत. त्यामुळे उद्धवजींनाही त्यावर विरोध करण्यास भाग पाडले.

हे सगळे बेगडी आहेत, अशी टीका त्यांनी केली. पर्यटन विभागाने नोटीस काढली आणि बारची वेळ वाढवली. मंदिर नाही पण मदिरालयाची वेळ वाढवली. मंदिरात कोरोना होतो, मदिरालयात कोरोना होत नाही. उद्धव साहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. देव, देश आणि धर्माची लढाई आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवली पण तुम्ही बदललात असा टोला त्यांनी हाणला.

केबीसीमध्ये धडक मारणार्‍या कु. अस्मिता गोरेचा गौरव सोहळा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या